Headlines

बिचुकले गावच्या शेतमजूर दाम्पत्याचा प्रामाणिकपणा, शेतात सापडलेला दीड लाखाचे मंगळसूत्र केले परत सुपूर्द

शेतात सापडलेलं सोन्याचं मंगळसूत्र परत केल्याबद्दल झरेकर दाम्पत्याचा गौरव करताना डॉ प्रियाताई महेश शिंदे ,शेतकरी विठ्ठल दादा पवार व ग्रामस्थ

कोरेगाव : रस्त्याने जाताना एखादी दहा रुपयांची नोट जरी दिसली तरी ती परत न करण्याची वृत्ती बळावत असताना व माणुसकी एका बाजूने हिरावत असताना सातारा जिल्ह्यातील बिचुकले गावच्या दत्तात्रय झरेकर दाम्पत्याने मात्र माणुसकीच्या नात्याला [आपल्या प्रामाणिकपणाचे कोंदण लावत समाजापुढे बावनकशी सोन्यासारखाच लक्ख आणि अमूल्य आदर्श घालून दिला. दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवनाऱ्या बिचुकले तालुका कोरेगाव येथील दत्तात्रय झरेकर या शेतमजूराने शेतात सापडलेले दीड लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र परत देऊन माणुसकीला प्रामाणिकपणाच्या सोन्याचा साज चढवला. दत्तात्रय झरेकर व त्यांच्या पत्नीने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचा गौरव कोरेगाव विधान सभेचे आमदार महेश शिंदे यांच्या सुविध्य पत्नी डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी झरेकर दाम्पत्याचा पैठणी व पोशाख देऊन गौरव केला.
एक महिन्यापूर्वी बिचुकले येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल पवार (दादा)यांच्या शेतात कांदा लागण सुरू होती यासाठी वाठार स्टे येथील महिला या ठिकाणी काम करत होत्या यातील एका महिलेचे मंगळसूत्र या शेतात पडले होते बऱ्याच वेळ शोधाशोध करुनही ते मिळाले नाही यामुळे संबंधित महिला निराश होऊन घरी परतली होती.
दरम्यान विठ्ठल पवार (दादा)यांच्या शेतात कायम शेतमजूर म्हणून काम करणारे शेतमजूर दत्तात्रय झरेकर हे हा कांदा भिजवण्याचे काम करत होते या वेळी त्यांना या शेतात हे मंगळसूत्र सापडले त्यांनी ही गोष्ट आपली पत्नी लक्ष्मी झरेकर यांना सांगितली दोघांनीही एक विचार करून हे सापडलेले मंगळसूत्र ज्यांचे आहे त्यांना परत देण्याची भूमिका घेत ते ओळख पटवून परत केले व आदर्श घालून दिला या प्रामाणिकपणाचे बिचुकले गावाचे सरपंच प्रशांत पवार, विठ्ठल दादा पवार, अमर पवार, चंद्रकांत पवार, विजय पवार, उपसरपंच सिद्धेश पवार व ग्रामस्थांनी कौतुक केले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *