Headlines

कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे गटात वाढले ‘इनकमिंग’

भाडळे खोऱ्यात कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला रामराम

हिवरे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश

कोरेगाव/प्रतिनिधी

हिवरे ता. कोरेगाव येथील माजी सरपंच अजित खताळ यांच्यासह सरपंच सुरेखा खताळ, उपसरपंच समाधान शिंदे, ग्रामपंचायत सदस्य

आमदार महेश शिंदे यांचे दूरगामी नियोजन, जलदगतीने विकास कामे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणे या त्रिसुत्रीला अनुसरून खटाव तालुक्यापाठोपाठ कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमदार महेश शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. दरूज पाठोपाठ हिवरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. हिवरे ग्रामपंचायतीमध्ये आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्वाखाली सत्ता आहे.
माजी सरपंच प्रकाश आगम, माजी उपसरपंच सुभाष आगम, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमंत आगम, माजी सैनिक उत्तम आगम, निवृत्त विस्तार अधिकारी जयसिंग आगम, अण्णा आगम, श्रीमंत आगम, गणेश रिठे, पोपट आगम, राजेंद्र आगम, दादा आगम, रामचंद्र आगम, दत्तात्रय आगम, चंद्रकांत आगम, ज्ञानेश्वर आगम व श्रीरंग आगम यांनी आमदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. यावेळी सर्वांचे स्वागत करून आमदार महेश शिंदे यांनी हिवरे गावाला जास्तीत जास्त विकास निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. हिवरे गावाला संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवून देणारे माजी सरपंच अजित खताळ यांच्यासह सरपंच सुरेखा खताळ, उपसरपंच समाधान शिंदे, ग्रामपंचायत सदस्य वैभव खताळ, धनश्री खताळ, तुळसाबाई ननावरे, प्रमुख पदाधिकारी नारायण खताळ, दादा खताळ, दत्तात्रय खताळ, सुनील आगम, संजय आगम व विष्णू आगम यावेळी उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यात अवर्षण प्रवण म्हणून शिक्का बसलेल्या भाडळे खोऱ्याचा जलसंधारणाद्वारे विकास करण्याचा निर्णय घेऊन आमदार महेश शिंदे यांनी प्रत्यक्षात या परिसरातील पाणी प्रश्न सोडवला आहे. अनेक वर्ष जिरायती असलेले क्षेत्र नजिकच्या काळात बागायती होणार असून मुंबई बेंगलोर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे ह्या परिसराचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवत हिवरे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
नव्याने प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकास कामांच्या अनुषंगाने आमदार महेश शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली.

भाडळे खोऱ्याचा पाणी प्रश्न सोडवला

भाडळे खोऱ्याचा विकास करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला असून रस्ते मार्गाने वाड्यावस्त्यार जोडल्या आहेत. आता मुंबई बेंगलोर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे देखील या खोऱ्यातून जात असून नजिकच्या काळात हा परिसर हा पूर्णपणे हायटेक होणार आहे. स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न संपुष्टात येणार असून कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे या परिसराला हक्काचे पाणी देखील मिळवून दिले आहे. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजनेमधून भाडळे खोऱ्यासाठी स्वतंत्र कॅनॉल बांधला जाणार असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *