sharad pawar and shrinivas patil friendship,
Sharad Pawar: शरद पवार- श्रीनिवास पाटील, ८० वर्षाच्या दोन मित्रांची कट्टर यारी
राष्ट्रवादीत बंड झाले अन अजित पवार यांनी भाजपसोबत युती करीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सोबत आलेल्या आठ आमदारांनाही मंत्री केले. या घटनेनेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह राजकीय क्षेत्राला मोठा हादरा बसला. शपथविधी सोहळ्यात शरद पवार यांचे एकेकाळचे अगदी विश्वासू चेहरे दिसले, अशावेळी पक्षात पक्षात फूट पडल्यावर दस्तूरखुद्द शरद पवार यांनी मोर्चा सांभाळला आणि राष्ट्रवादी पक्ष पुन्हा नव्याने बांधण्याचा निर्धार केला, यावेळी त्यांच्या सोबत उभा ठाकला तो त्यांचा ८० वर्षाचा जिवलग मित्र, ज्या ज्यावेळी शरद पवार यांना राजकारणात घेरण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी त्या त्या वेळी तो भक्कमपणे शरद पवार यांच्या सोबत उभा राहिला ..मग ती पावसाची सभा असू कि काल कराड मधून सुरु केलेली नवसुरुवात… आणि सोबतीला असलेल्या त्या मित्राचे नाव होते खासदार श्रीनिवास पाटील आणि याच ८० वर्षाच्या मित्रांची कट्टर यारी अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. sharad pawar shrinivas patil friendship
शरद पवार आणि श्रीनिवास यांची दोस्ती संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, पुण्यात एस पी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षणापासून जीवनापासून दोघांचे मैत्रीचे बंध जुळले ते पुढे अनेक प्रसंगातून आणखी घट्ट झाले. दोघेही राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांना मानणारे त्यामुळे या मैत्रीला वैचारिक बैठक मिळाली. पैकी पुढे शरद पवार नावाचे एक मित्र संघटनात्मक कौशल्यातून राजकारणात कार्यरत झाले तर दुसरे मित्र श्रीनिवास पाटील प्रशासकीय हातोटीवर प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी झाले. दोघांच्या करिअरच्या वाटा वेगळ्या होत्या विचार मात्र यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेला लोकसेवेचा होता.
१९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना अन मित्राच्या शब्दाखातर नोकरीचा राजीनामा
शरद पवार यांनी तो पर्यंत राजकारणात मोठे नाव कमावले होते, १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर राज्यात स्वतःचा पक्ष वाढवणे अवघड काम होते. यावेळी कराड लोकसभेसाठी शरद पवार यांनी याच भागातील आपल्या जुन्या मित्राचे श्रीनिवास पाटील यांचे नाव पुढे केले. श्रीनिवास पाटील यांनीही ३५ वर्षाच्या नोकरीचा राजीनामा फक्त मित्राच्या शब्दाखातर दिला आणि राजकारणात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे मात्तबर नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड मतदार संघात वर्चस्व होते, मात्र श्रीनिवास पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करून राष्ट्रवादीला पहिले यश मिळवून दिले. आपल्या अस्सल गावरान व रांगड्या भाषणांनी श्रीनिवास पाटील यांनी कराडचे मैदान जिंकलं व पुनर्र्चनेत कराड मतदार संघच गायब झाला यावेळी त्यांना शरद पवार यांनी सिक्कीमचे राज्यपाल म्हणून संधी दिली.तिथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला.
लोकसभेच्या मैदानात पाटील आणि शरद पवार यांची गाजलेली पावसातील सभा
राष्ट्रवादी पक्षाला यावेळी अनेक नेत्यांनी सोडचिठी देत भाजपात प्रवेश केला होता त्यामुळे पक्ष अडचणीत आला होता, साताऱ्यात तर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला, यावेळी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूका या विधानसभेसोबत लागलेली. यावेळी पुन्हा साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या लोकप्रियतेपुढे कोणाचा निभाव लागणार असा प्रश्न उभा राष्ट्रवादी पक्षापुढे उभा राहिला राहिला. तेव्हा शरद पवार यांच्या मदतीला श्रीनिवास पाटीलच धावून आले. पुढे साताऱ्यात पावसातील सभा गाजली, यावेळी दोन्ही मित्रांचा पावसातल्या फोटोने इतिहास घडवला आणि राष्ट्रवादीला राज्यात मोठे यश मिळाले.
२०२३ ला राष्ट्रवादी पक्षात फूट अन मित्राच्या पाठीशी खंबीर साथ
काल परवा राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नव्याने उभा करणार असल्याचे जाहीर केले. किती जणांनी बंडखोरी केली, कोण कुठे अशा चर्चा असताना शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून नवा एल्गार केला यावेळी शरद पवार कराड दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या सोबत त्यांच्या हातात हात घट्ट देऊन त्यांचा हाच जुना मित्र व लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे खंबीरपणे उभे ठाकल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. ८० व्या वर्षी आपला मित्र पुन्हा हितशत्रूंनी घेरला असताना त्यांच्या पाठीशी तितकीच खंबीरपणे उभे राहून श्रीनिवास पाटील यांनी हि दोस्ती अधोरेखित केली. यावेळी ८० वर्षाच्या दोन मित्रांची हि दोस्ती अनेकांना सामान्य जीवनातही बरेच काही सांगून गेली. sharad pawar shrinivas patil friendship
हि बातमी तुम्ही वाचली का https://maharashtraone.com/?p=148: Sharad Pawar: ८० वर्षाच्या दोस्तांची यारी- शरद पवारांसाठी श्रीनिवास पाटलांची खंबीर साथ कालपण.. आजपण