Toyota Innova Hycross Flex Fuel Hybrid: पेट्रोलचं टेन्शन संपलं! टोयोटाची पहिली फ्लेक्स-फ्युएल हायब्रीड कार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Toyota Innova Hycross Flex Fuel Hybrid: पेट्रोलचं टेन्शन संपलं! टोयोटाची पहिली फ्लेक्स-फ्युएल हायब्रीड कार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Toyota innova hycross flex fuel hybrid : वाढत्या इंधनदरामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक अनोखा पर्याय बाजारात आला आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने देशातील पहिली फ्लेक्स हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करण्याची घोषणा केली.

या कारमध्ये ग्राहकांना सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉन्ग हायब्रीड तंत्रज्ञान आणि E२० ते E८५ पर्यंतच्या सर्व इथेनॉल इंधन मिश्रणावर धावण्याची क्षमता असलेला पर्याय मिळणार आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरू होत आहे.

स्थानिक पातळीवर उत्पादित फ्लेक्स-फ्युएल इंजिन आणि ई-ड्राइव्हने सुसज्ज असलेले हे मॉडेल देशाच्या ऊर्जा सुरक्षा आणि डीकार्बोनायझेशन उद्दिष्टांना बळ देणारे ठरेल. भारत आणि जपानमधील टोयोटाच्या अभियंत्यांनी देशभरातील शहरे, महामार्ग, डोंगराळ भाग आणि विविध हवामानात या वाहनाची कठोर चाचणी घेतली आहे. “ऊर्जा संक्रमण आणि कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने कोणताही एकच उपाय असू शकत नाही. भारतासारख्या वैविध्यपूर्ण बाजारपेठेत इलेक्ट्रिफिकेशन आणि E20 ते E85 इथेनॉल फ्लेक्सिबिलिटीमुळे ग्राहकांचे पर्याय अधिक विस्तारतील, असा विश्वास टोयोटा किर्लोस्कर मोटरचे चेअरमन, एमडी आणि सीईओ मसाकाझू योशिमुरा यांनी व्यक्त केला.

इंजिन, मायलेज आणि तांत्रिक वैशिष्ट्ये

यामध्ये टोयोटा हायब्रीड सिस्टीम आणि ई-ड्राइव्ह ट्रान्समिशनसह २.०-लिटर TNGA इंजिन दिले आहे, जे १४७ kW (१९७.१३ HP) कमाल पॉवर निर्माण करते. ईव्ही, इको आणि पॉवर हे तीन ड्राइव्ह मोड्स यात आहेत. E२० इंधन मिश्रणासह ही गाडी २२.५८ किमी/लिटर इतके प्रभावी मायलेज देते आणि आगामी WLTP नियमांनुसार तयार करण्यात आली आहे. एसयूव्ही-प्रेरित दमदार लूकसाठी नवीन बंपर, डबल-स्टॅक्ड एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि रियर क्रोम गार्निश देण्यात आले आहे. ही गाडी सुपर व्हाइट, प्लॅटिनम व्हाइट पर्ल मायका, सिल्व्हर मेटॅलिक, ब्लॅकिश अगेहा ग्लास फ्लेक आणि अ‍ॅटिट्यूड ब्लॅक मायका या पाच रंगांत उपलब्ध आहे.

प्रीमियम केबिन आणि आधुनिक सुरक्षा फीचर्स

७-सीटर आणि ८-सीटर पर्यायांत उपलब्ध असलेल्या या गाडीच्या केबिनमध्ये सॉफ्ट-टच डॅशबोर्ड, ब्लू अ‍ॅम्बियंट लाइटिंग, पॉवर्ड ओटोमन सीट्स, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पीएम २.५ एअर फिल्टर आणि पॉवर बॅक डोअर यांसारख्या सुविधा आहेत. मनोरंजनासाठी १२.३-इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम, १२.३-इंच टीएफटी डिस्प्ले, वायरलेस अ‍ॅपल कारप्ले/अँड्रॉइड ऑटो, टोयोटा आय-कनेक्ट आणि सब-वूफर्ससह ९-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टीम दिली आहे. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, सर्व चाकांना डिस्क ब्रेक्स, एबीएस-ईबीडी आणि टोयोटा सेफ्टी सेन्स ३.० अंतर्गत डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन ट्रॅकिंग असिस्ट व ब्लाइंड स्पॉट मॉनिटरचा समावेश आहे.

व्हेरिएंट्स आणि एक्स-शोरूम किमती

नवीन इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड एकूण चार मुख्य ग्रेड्समध्ये उपलब्ध आहेत. जी हायब्रीडच्या ७ आणि ८ सीटर कारची किंमत १९,९९,००० लाखांपासून सुरू होते. जीएक्स हायब्रीड ७ सीटर २३,९९,००० लाख, जीएक्स हायब्रीड ८ सीटर २४,०४,००० लाख, व्हीएक्स हायब्रीड ७ सीटर २८,७९,००० लाख व्हीएक्स हायब्रीड ८ सीटर २८,८४,००० लाख आणि झेडएक्स हायब्रीड ७ सीटर ३१,९९,००० लाख रुपयांपासून सुरू होते.

या वाहनासोबत ३ वर्षे किंवा १,००,००० किमीची स्टँडर्ड वॉरंटी (जी ५ वर्षे / २,२०,००० किमीपर्यंत वाढवता येते), हायब्रीड बॅटरीवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमीची वॉरंटी, ३ वर्षांची रोडसाइड असिस्टन्स आणि ‘टी-केअर’ (T-Care) पॅकेजचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू