Diwali Festival 2026 विद्यार्थ्यांनी आकाश कंदील, पणत्या व शुभेच्छापत्रांमधून केली दिवाळीची तयारी, देऊरच्या जिल्हा परिषद शाळेत दिवाळी कार्यशाळा

Diwali Festival 2026 विद्यार्थ्यांनी आकाश कंदील, पणत्या व शुभेच्छापत्रांमधून केली दिवाळीची तयारी, देऊरच्या जिल्हा परिषद शाळेत दिवाळी कार्यशाळा

सातारा/प्रतिनिधी

Diwali Festival 2026 देऊर (ता. कोरेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ‘आनंददायी शनिवार’ या अभिनव उपक्रमा अंतर्गत नुकतेच दिवाळी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्यामध्ये उपक्रमशीलता वाढवणे हा होता. दिवाळीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

आकाश कंदील, पणत्या व शुभेच्छापत्र बनवायचा आनंद व कौशल्य वाढीला

Diwali Festival 2026 कार्यशाळेमध्ये विविध इयत्तांनुसार उपक्रमांची रचना करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे रंगवून रंगकामाचा सराव केला. इयत्ता दुसरी आणि तिसरी साठी आकाश कंदील तयार करणे, जोडणे व सजावट हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत सुंदर असे आकाश कंदील तयार केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मातीच्या पणत्या आकर्षक रंगात रंगवून सजवल्या. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सुंदर अशी शुभेच्छापत्रे देखील तयार केली. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आकाश कंदील, पणत्या व शुभेच्छापत्र बनवायचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, ज्याचा त्यांना मोठा आनंद झाला आणि त्यांच्या सर्जनशील कौशल्यात देखील वाढ झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून दिवाळीची पूर्वतयारी देखील करून घेण्यात आली.

मुख्याध्यापिका व शिक्षकांचे मार्गदर्शन

Diwali Festival 2026 या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापिका शोभा शिंदे, उपशिक्षिका सुनीता गायकवाड, वैशाली चव्हाण व रमेश चव्हाण यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून योगदान दिले. शिक्षकांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना उपक्रम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून कौतुक

या अभिनव उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. निलेश कदम, उपाध्यक्ष श्री. सुधीर काकडे व सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच, ग्रामस्थ व पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी मा. कोमल दरेकर मॅडम, विस्ताराधिकारी मा. विशाल कुमठेकर साहेब, मा. वनिता मोरे मॅडम आणि केंद्रप्रमुख मा. शिवाजी तावरे साहेब या सर्वांनी शाळेच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू