Pik Bima Yojana Mapping Error Satara Koregaon: पीक विमा मॅपिंगच्या चुकीमुळे नलवडेवाडी अन् बिचुकलेतील शेतकरी अडचणीत; रणजित सरकाळे यांचे प्रशासनाला निवेदन!

सातारा | Maharashtra One News
प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत कोरेगाव तालुक्यातील नलवडेवाडी आणि बिचुकले येथील शेतकऱ्यांवर प्रशासकीय चुकीमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. वाठार स्टेशन सर्कलमध्ये येणाऱ्या या दोन्ही गावांचे पीक विमा (Pik Bima Yojana) मॅपिंग चुकीच्या पद्धतीने वाठार-किरोली देश मंडळ/सर्कलमध्ये झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे पात्र शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली असून, शिवसेना कोरेगाव तालुका संघटक रणजित सरकाळे यांनी थेट अधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
मॅपिंगच्या चुकीमुळे पीक विमा लाभावर टांगती तलवार!
नलवडेवाडी व बिचुकले ही गावे प्रशासकीय दृष्ट्या वाठार स्टेशन सर्कलच्या कार्यक्षेत्रात येतात. मात्र, Pik Bima Yojanaपोर्टलवरील मॅपिंग वाठार-किरोली सर्कलमध्ये दाखवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. Pik Bima Yojana योजनेअंतर्गत पिकांची नोंद, क्षेत्र आणि प्रशासकीय नोंदी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मॅपिंगमधील या चुकीमुळे भविष्यात नुकसान भरपाई किंवा विम्याचा हप्ता मंजूर होताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊन पात्र शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रणजित सरकाळे यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा
ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर शिवसेना कोरेगाव तालुका संघटक रणजित सरकाळे यांनी तातडीने संबंधित कृषी व विमा अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. मॅपिंगची त्रुटी त्वरित दुरुस्त करून दोन्ही गावांचा समावेश योग्य त्या वाठार स्टेशन सर्कलमध्ये करण्यात यावा, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याला Pik Bima Yojana पीक विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. यावर अधिकाऱ्यांनी चौकशी करून ही मॅपिंगची समस्या लवकरात लवकर सोडवली जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले आहे.












