Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Update: लाडकी बहीण योजनेची e-KYC आणि स्टेटस ऑनलाईन कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत

मुंबई | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Majhi Ladki Bahin Yojana ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत जुलै २०२६ च्या हप्त्यापोटी तब्बल ३१९.५३ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. मात्र, सरकारने राबवलेल्या कडक छाननी मोहिमेत कागदपत्रांची अपूर्तता, बँक खाते आधार कार्डशी न जोडणे आणि ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असल्यामुळे तब्बल ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. तुमचा हप्ता अडकू नये आणि तुमचे नाव पात्र यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी घरबसल्या ई-केवायसी व अर्जाचे स्टेटस तपासणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
अर्जाचे ऑनलाईन स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासण्यासाठी सर्वात आधी सरकारच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे मुख्य पृष्ठावर असलेल्या Applicant Login या पर्यायावर क्लिक करून तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कोड टाकून लॉगिन करावे. लॉगिन झाल्यानंतर Applications Made म्हणजेच ‘यापूर्वी केलेले अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा. तेथे तुमच्या अर्जासमोर Approved (मंजूर), Pending (प्रलंबित) किंवा Disapproved (अपात्र) असा स्पष्ट उल्लेख दिसेल. जर तेथे ई-केवायसी किंवा आधार लिंक प्रलंबित असल्याचे दाखवत असेल, तर तुम्हाला त्वरित दुरुस्ती करावी लागेल.
बँक खात्याचे आधार सीडींग आणि e-KYC कसे पूर्ण करावे?
Majhi Ladki Bahin Yojana योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता थेट जमा होण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Seeding / DBT Enabled) असणे बंधनकारक आहे. बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे पाहण्यासाठी myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन Bank Seeding Status तपासावे. जर बँक खाते लिंक नसेल, तर तात्काळ तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन डीबीटी (DBT) फॉर्म भरून आधार लिंक करून घ्यावे. जर बँक प्रक्रियेला वेळ लागत असेल, तर जवळच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) जाऊन नवीन आधार लिंक बँक खाते उघडल्यास ई-केवायसीची समस्या त्वरित दूर होते.
फेक वेबसाईट आणि फसव्या लिंक्सपासून सावधान!
Majhi Ladki Bahin Yojana ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची वाढती लोकप्रियता पाहून काही सायबर भामट्यांनी आणि असामाजिक तत्वांनी या योजनेच्या नावाखाली अनेक बनावट (Fake) वेबसाईट, ॲप्स आणि व्हॉट्सॲपवर फसव्या लिंक्स पसरवण्यास सुरुवात केली आहे. ई-केवायसी (e-KYC) अपडेट करणे किंवा अर्जाचे स्टेटस तपासण्याच्या बहाण्याने या फसव्या लिंक्सद्वारे महिलांची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील आणि ओटीपी (OTP) चोरले जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महिलांनी कोणत्याही अज्ञात किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच अशा बनावट ॲप्सवर आपली कागदपत्रे अपलोड करू नयेत. शासनाची ladakibahin.maharashtra.gov.in हीच एकमेव अधिकृत वेबसाईट असून, कोणत्याही मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी केवळ अधिकृत सरकारी केंद्र, सेतू सुविधा केंद्र किंवा अंगणवाडी सेविकेशीच संपर्क साधावा.












