Ghigewadi Development Works Demand Statement Guardian Minister Shambhuraj Desai : घिगेवाडीतील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना ग्रामपंचायतीचे निवेदन!

Ghigewadi Development Works Demand Statement Guardian Minister Shambhuraj Desai : घिगेवाडीतील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना ग्रामपंचायतीचे निवेदन!

सातारा |महाराष्ट्र वन वृत्तसंस्था

मौजे घिगेवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील विविध मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी विविध महत्त्वाची कामे तत्काळ मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन घिगेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत यांनी पालकमंत्री नामदार श्री. शंभूराज देसाई Minister Shambhuraj Desai यांना मागण्यांचे निवदेन दिले.

गावातील अंतर्गत रस्ते, बंधारे अन् शाळा सक्षमीकरणावर भर

ग्रामपंचायतीने दिलेल्या या निवेदनात गावातील अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या कामांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने श्री काळूबाई देवी मंदिर येथे भव्य सभा मंडप उभारणे, गावातील वाढत्या वस्तीनुसार गावठाण हद्दवाढ मंजूर करणे, तसेच ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते तयार करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय शेती आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी वसना नदीवर नवीन बंधारे मंजूर करण्याची महत्त्वपूर्ण मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शैक्षणिक सुविधा अन् तरुणांसाठी सुसज्ज जिमची मागणी

गावातील विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या विकासासाठी निवेदनात विशेष भर देण्यात आला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घिगेवाडी येथे वॉल कंपाऊंड घालणे, स्वतंत्र खोली (टॉयलेट-बाथरूम साहित्यासह) बांधणे आणि पेव्हर बॉक्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गावातील क्रीडाप्रेमी व तरुणांसाठी अत्याधुनिक साहित्याने सुसज्ज अशी व्यायामशाळा व जिम (Gym) उपलब्ध करून द्यावी, अशी नम्र विनंती सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. हे सर्व विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत यांच्यासह माजी उपसरपंच आदिनाथ सावंत, सोसायटी चेअरमन धनसिंग सावंत, सोसायटी संचालक लक्ष्मण सावंत, डॉ. पोपट सावंत, सोसायटी उपाध्यक्ष भरत घिगे,सतिश मधुकर धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू