Roll To Reel Photography Journey World Photography Day: कॅमेऱ्याच्या ‘रोल’पासून इन्स्टाग्रामच्या ‘रील’पर्यंतचा फोटोग्राफीचा हायटेक प्रवास !

मुंबई | Maharashtra One News
World Photography Day काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले आणि त्यासोबतच मानवी आयुष्यातील क्षण टिपण्याची पद्धतही पूर्णपणे बदलली. एक काळ असा होता जेव्हा कॅमेऱ्यात ३६ फोटोंची ‘रोल’ (Film Roll) टाकून अत्यंत जपून फोटो काढावे लागायचे. फोटो कसा आलाय हे पाहण्यासाठी धुवून (Develop) येईपर्यंत दिवसेंदिवस वाट पाहावी लागायची. मात्र आज एका क्लिकवर शेकडो फोटो आणि क्षणात सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या ‘रील्स’चा (Reels) जमाना आला आहे. फोटोग्राफीचा हा ‘रोल ते रील’ (Roll to Reel) पर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आणि अचंबित करणारा आहे.
३६ फोटोंचा ‘ब्लॅक अँड व्हाईट’ व रंगीत रोलचा काळ
१९८० आणि ९० च्या दशकात Camera घरात असणे हे मोठे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. कोडाक (Kodak), फुजीफिल्म (Fujifilm) यांसारख्या कंपन्यांच्या ३६ फोटोंच्या रोलचा वापर केला जायचा. लग्न, वाढदिवस किंवा सहलीला जाताना रोल संपू नये म्हणून प्रत्येक Photo काढताना हजार वेळा विचार करावा लागायचा. फोटो काढून झाल्यानंतर ते डार्क रूममध्ये (Dark Room) रसायनांच्या साहाय्याने धुवून कागदावर Print केले जायचे. तो फोटो हातात आल्यानंतर मिळणारा आनंद आणि उत्सुकता काही वेगळीच असायची.
डिजिटल कॅमेरा आणि मेमरी कार्डची क्रांती
२००० च्या दशकानंतर फोटोग्राफीच्या जगतात ‘डिजिटल क्रांती’ झाली. ‘डीएसएलआर’ (DSLR) आणि डिजिटल कॅमेऱ्यांच्या आगमनाने रोलची जागा मेमरी कार्डने घेतली. यामुळे अमर्याद फोटो काढण्याची मुभा मिळाली आणि काढलेला फोटो लगेच कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर पाहणे शक्य झाले. यामुळे फोटोग्राफीमधील चुका लगेच दुरुस्त करणे सोपे झाले आणि सर्वसामान्य माणसाचाही कॅमेऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
स्मार्टफोनचे आगमन आणि सोशल मीडियाचे ‘रील’ युग
गेल्या दशकात स्मार्टफोनमधील हाय-टेक कॅमेऱ्यांनी फोटोग्राफीचे संपूर्ण चित्रच पालटून टाकले. हजारो रुपयांचा कॅमेरा खिशात घेऊन फिरण्याची गरज उरली नाही. आज ४K Video, Potrait Mode आणि एआय (AI) तंत्रज्ञानाने सज्ज असलेले Smartphoe प्रत्येकाच्या हातात आहेत. फोटोग्राफी आता केवळ स्थिर चित्रांपुरती (Static Photos) मर्यादित न राहता १५ ते ३० सेकंदांच्या ‘रील्स’ आणि शॉट व्हिडिओंपर्यंत पोहोचली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून आजचा प्रत्येक तरुण स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग रील्सच्या स्वरूपात जगासमोर मांडत आहे.
माध्यम बदलले तरी ‘भावभावनांचा’ स्पर्श कायम!
ब्लॅक अँड व्हाईट फोटोंपासून सुरू झालेला हा प्रवास आज हाय-डेफिनिशन रील्सपर्यंत पोहोचला असला, तरी फोटोग्राफीमागचा मूळ उद्देश आजही तोच आहे — तो म्हणजे “आनंदाचे क्षण जतन करणे”. तंत्रज्ञानाने वेग निश्चितच आणला, पण जुन्या आल्बमची पाने चाळताना मिळणारा तो जुन्या आठवणींचा सुगंध आजच्या डिजिटल गॅलरीतही शोधून सापडत नाही, हेही तितकेच सत्य आहे.













