Independence Day 2026 : अंबवडेत गावाच्या शैक्षणिक कार्याला माजी सैनिकांचा हातभार; शाळेला स्मार्ट पॅनेलसाठी १ लाखांची मदत

Independence Day 2026 : अंबवडेत गावाच्या शैक्षणिक कार्याला माजी सैनिकांचा हातभार; शाळेला स्मार्ट पॅनेलसाठी १ लाखांची मदत

सातारा/ महाराष्ट्र वन वृत्तसंस्था

Independence Day 2026 स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टचे औचित्य साधून वसना पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित ‘मॉडर्न इंग्लिश स्कूल’ अंबवडे (सं. वा., ता. कोरेगाव, जि. सातारा) या विद्यालयाच्या शैक्षणिक विकासासाठी आजी-माजी सैनिक संघटना, अंबवडे यांच्या वतीने मोठी मदत करण्यात आली आहे. शाळेत डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी ‘स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनेल’ खरेदीसाठी तब्बल एक लाख रुपयांचा भरघोस निधी विद्यालयाकडे सुपूर्त करण्यात आला. माजी सैनिकांच्या या सामाजिक दायित्वाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन होणार अधिक परिणामकारक

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण मिळावे, या उदात्त उद्देशाने आजी-माजी सैनिक संघटनेने हे आर्थिक सहकार्य केले आहे. विद्यालयाच्या वतीने या मदतीचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. या नवीन स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनेलमुळे शिक्षकांचे अध्यापन अधिक रंजक व सोपे होणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे.

ध्वजारोहण, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि धनादेश सुपूर्त

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रारंभी विद्यालयात दिमाखात ध्वजारोहण पार पडले. यानंतर विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर लयबद्ध कवायत प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गत शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात आजी-माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसना पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र सकुंडे (गुरुजी), सचिव सुरेश सकुंडे आणि शालेय समितीचे अध्यक्ष मोहन सकुंडे यांच्याकडे १ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.

मुख्याध्यापकांकडून आभार; ग्रामस्थांकडून उपक्रमाचे कौतुक

विद्यालयाचे मुख्याध्यापक चेतन बाळकृष्ण चव्हाण यांनी आजी-माजी सैनिक संघटनेच्या या अनमोल शैक्षणिक योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील घटकांनी अशा प्रकारे पुढे येऊन सहकार्य करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी सैनिक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशरक्षणासोबतच शिक्षणासाठी पुढे आलेल्या सैनिकांच्या या कार्याचे उत्तर कोरेगाव परिसरात विशेष कौतुक केले जात आहे.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू