Ladki Bahin Yojana July Installment Update 2026: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलै महिन्याचा हप्ता मिळणार ‘या’ दिवशी; ३१९ कोटी मंजूर, पण ८० लाख महिलांचा लाभ बंद

मुंबई | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि राज्यातील लाखो महिलांच्या जगण्याचा आधार ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ Ladki Bahin Yojana पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जुलै २०२६ च्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची जमवाजमव पूर्ण केली असून प्रशासकीय स्तरावर हालचालींना मोठा वेग आला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर १२ ऑगस्ट २०२६ रोजी या निधीच्या वितरणाचा अधिकृत शासन निर्णय Ladki Bahin Yojana July Installment Update 2026 (GR) जारी करण्यात आला आहे.
जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी ३१९ कोटींहून अधिक निधी मंजूर
शासकीय निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै २०२६ च्या हप्त्यापोटी Ladki Bahin Yojana July Installment Update पात्र लाभार्थी महिलांना पैसे देण्यासाठी तब्बल ३१९.५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या प्रमुख सचिवांना वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच पात्र महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपयांचा हप्ता थेट वर्ग केला जाणार आहे. सामान्य लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात, तर पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत ५०० रुपये अदा केले जातात.
छानाची मोहीम कठोर; तब्बल ८० लाख महिला अपात्र
या योजनेच्या अंमलबजावणीत पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी महिला व बालविकास विभागाने राज्यभरात कडक छाननी मोहीम राबवली आहे. या छाननी प्रक्रियेमध्ये आणि ई-केवायसी (e-KYC) पडताळणीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. Ladki Bahin Yojana अनेक अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता न होणे, बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे किंवा ई-केवायसी अपूर्ण असणे, अशा अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या नियमांत आणि निकषांत न बसल्यामुळे तब्बल ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले असून त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
बँक खाते अपडेट ठेवण्याचे आवाहन
ज्या महिलांची e-KYC पूर्ण आहे आणि सर्व कागदपत्रे अचूक आहेत, अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात येत्या काही दिवसांतच जुलैचा हप्ता जमा होणार आहे. ज्या महिलांना अद्याप लाभ मिळालेला नाही किंवा अर्ज अपात्र झाला आहे, त्यांनी आपल्या अर्जातील त्रुटी दूर करून e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.













