Shambhuraj Desai पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते डॉ.सचिन जाधव यांचा गौरव

Shambhuraj Desai पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते डॉ.सचिन जाधव यांचा गौरव

डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल केला सन्मान, डॉ.सचिन जाधव पाटण तालुक्यातील तारळे गावाचे सुपुत्र

कराड/प्रतिनिधी

जयहिंद करिअर अकॅडमी’चे संस्थापक अध्यक्ष सचिन भरत जाधव यांच्या बाबतीत हेच सत्य ठरले आहे. गेली १५ वर्षे आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि निष्ठेने केलेल्या समाजकार्याची दखल घेत, ‘इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन कौन्सिल’ या संस्थेच्या वतीने त्यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई Shambhuraj Desai यांच्या हस्ते जयहिंद करियर अकॅडमिचे संस्थापक अध्यक्ष. डॉ. सचिन भरत जाधव सर यांचा. डॉक्टरेट पदवी मिळाल्यामुळे सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सचिन जाधव पाटण तालुक्यातील तारळे गावाचे सुपुत्र आहेत.

नुकतेच गोव्यामध्ये पार पडलेल्या या विशेष सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते सचिन जाधव यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती दुर्गा लक्ष्मी राजन (संचालक व अध्यक्ष, नृत्यालय, गोवा सरकार), डॉ. ए. एस. नदाफ (किंग फैजल हॉस्पिटल व संशोधन केंद्र, रियाध), के. उदयश्री (गोवा), डॉ. गणेश वायकर (सहसचिव, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन कौन्सिल) आणि सोनिया माणगावकर (शिक्षिका, सरकारी माध्यमिक शाळा, गोवा) हे उपस्थित होते.

तारळे विभागात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एका कार्यक्रमादरम्यान डॉ. सचिन जाधव यांचा सन्मान केला. यावेळी पाटण पंचायत समिती चे सभापती माननिय सौ. सविता पवार मॅडम, उपसभापती. श्री विजय नाना पवार, जिल्हा परिषद सदस्य. सौ. स्वप्ना. पाटील मॅडम, पंचायत समिती पाटण चे सदस्य.श्री विकास जाधव,पाटण क्षेत्रस्तरीय समिती चे अध्यक्ष, श्री. गजाभाऊ जाधव, रामभाऊ लाहोटी, बबन बापू, संजय देशमुख, अभिजित पाटील, सदाभाऊ जाधव, नामदेव साळुंखे, बाळासाहेब खबालें पाटील , विजय पवार, सोमनाथ खामकर, श्रीकांत जाधव, समीर भोसले, बाळासो सूर्यवंशी, माणिक पवार, देवानंद सपकाळ, एम. डी. जाधव, युवराज नलवडे, दीपक जाधव, प्रनील यादव, रामचंद्र देशमुख, रामचंद्र जाधव, अमोल साळुंखे, डॉ. राजेंद्र जाधव, डी.एन. जाधव, बेदी काका,पोपट साळुंखे. इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते तारळे व तारळे भागातील तमाम मान्यवर यांनी डॉ. सचिन जाधव सर यांना सदिच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

lagnaustav.com
lagnaustav.com

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू