कोरेगावात रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ‘शीरखुर्मा किट’चे घरोघरी वितरण

कोरेगावात रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ‘शीरखुर्मा किट’चे घरोघरी वितरण

प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचा सर्वधर्मसमभावाचा अभिनव उपक्रम; दत्तनगर येथून शुभारंभ, कालेकर कॉलनी येथे समारोप

कोरेगाव : रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र हा मुस्लिम धर्मीयांचा अत्यंत पवित्र आणि प्रमुख सण असून पवित्र रमजान महिन्यातील ३० दिवसांच्या उपवासानंतर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आनंद, बंधुत्व, त्याग आणि दानाचा संदेश देणाऱ्या या सणाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला.

कोरेगाव येथील दरबार उद्योग समूहाचे प्रमुख संचालक तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकाराने शहरातील मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईद उत्साहात साजरी करता यावी यासाठी शीरखुर्मा बनविण्याचे साहित्य असलेल्या ‘ईद किट’चे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ दत्तनगर येथे काझी कुटुंबियांच्या निवासस्थानासमोर करण्यात आला.

या कार्यक्रमात माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी, ज्येष्ठ समाजबांधव निसार खान, असलम शेख, सातारा सेव्हन स्टार न्यूजचे संपादक अज्जू मुल्ला, मुस्ताक खान, मुनीर सय्यद, उमर जमादार, समीर कागदी, सिकंदर खलीफा, सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे, निशांत माने, यशराज बर्गे, अजित कदम, आकाश साळुंखे आदी मान्यवरांच्या हस्ते मुस्लिम समाज बांधवांना किटचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमानंतर सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील विविध भागात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मुस्लिम समाज बांधवांना शीरखुर्मा किटचे वितरण करण्यात आले. कालेकर कॉलनी परिसरात प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगरसेवक संतोष बर्गे, सिद्धार्थ बर्गे, योगेश बर्गे, निशांत माने, बबलू जमादार, राजू मुल्ला, मोसिन शेख, शाहरुख मुजावर, वसीम शिकलगार, वाहिद शेख, मुदसिर कुरेशी, राजू बेग, मोहसीन मुल्ला, कयूम मनेर, दस्तगीर सय्यद, रफिक नाना शिकलगार आदी पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम कुटुंबांना भेट देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि किटचे वितरण केले. या भेटींमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी मुन्नाभाई काझी यांनी सांगितले की, प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या प्रयत्नांमुळे मुस्लिम समाजाला कोरेगाव नगरपंचायतीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. समाज बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मुस्लिम समाजाशी एकरूप होऊन रमजान ईद साजरी करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सोनेरी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष नलावडे यांनी सांगितले की, कोरेगाव शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दरबार उद्योग समूहाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. मुस्लिम समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्याचे कामही राजाभाऊ बर्गे यांनी केले आहे. शहराच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की, शहरातील प्रत्येक मुस्लिम कुटुंबापर्यंत शीरखुर्मा किट पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे कोरेगाव शहरात सामाजिक ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश दिला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

मुस्लिम समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण

प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी सर्वधर्मसमभावाची भूमिका जोपासत मुस्लिम समाजाला नेहमीच आदराचे स्थान दिले आहे. शहरातील प्रत्येक मुस्लिम कुटुंबापर्यंत ईदचे किट पोहोचविण्याच्या या उपक्रमामुळे कोरेगाव शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत रमजान ईदचा सण अधिक उत्साहात साजरा करण्याचे वातावरण निर्माण झाले. किट वितरणाच्या कार्यक्रमात समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)