Headlines

Aani Bani: 28 जुलैपासून महाराष्ट्रात सर्वत्र ‘आणीबाणी’ लागणार, काय आहे प्रकरण जाणून घ्या 

Aani Bani मराठी

मराठीतील दिग्गज कलाकारांचा Aani Bani सहभाग

हो २८ जुलैपासून महाराष्ट्रात आणीबाणी लागणार आहे, पण तुमच्या मनात आणीबाणी हा शब्द एकूण जो काळ आठवला त्याच  कालावधीतील कटू आठवणीची रंजक कहाणी घेऊन नवोदित दिग्दर्शक दिनेश जगताप व प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी साकारलेला आणीबाणी Aani Bani Marathi film हा सिनेमा या दिवशी सिनेमागृहात लागणार आहे. आणि या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये  कमालीची उत्सुकता आहे. 

सन १९७५ सालच्या देशात लागू झालेल्या आणीबाणी च्या अनेक कटू आठवणी घेऊन एक पिढी जगत आहे. या आणीबाणीच्या गंभीर काळातील ग्रामीण भागातील एका कुटुंबाची रंजक गोष्ट हलक्या फुलक्या रीतीने मांडण्याचे धाडस लेखक अरविंद जगताप व दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी केले आहे. आता या आणीबाणीत नेमकं काय दडलंय, आणीबाणीचा सामना कसा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

मराठीतील दिग्गज कलाकार ‘आणीबाणी’त 

Aani Bani Marathi film आणीबाणीची पार्श्वभूमी गंभीर असली तरी हा विषय मार्मिकपणे सादर करण्याचे कसब या टीम ने साधले आहे नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे उषा नाईक, वीणा जामकर,प्राजक्ता हनमघर, सीमा कुकरणी, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा दिग्गज कलाकारांची टीम आणीबाणी त सहभागी झाली आहे. त्यामुळे हि आणीबाणी चिंता दूर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

अरविंद जगताप – दिनेश जगताप यांची आणीबाणी 

Marathi cinema नावाजलेले लेखक म्हणून अरविंद जगताप Arvind Jagtap यांची ओळख प्रेक्षकांना आहे. पटकथाकार,नाटककार, गीतकार, संवाद अशा विविध भूमिकांतून अनेक विषयांची हाताळणी करीत त्यांनी वेगळेपण सिद्ध केले आहे. डांबिस, सगळे करून भागले,वॉन्टेड बायको नं. १, उबंटू अशा त्यांच्या कलाकृती गाजल्या आहेत आता आणिबाणीतून ते प्रेक्षकांसमोर आव्हानात्मक विषय हलक्या फुलक्या रूपात घेऊन येत आहेत तर दिनेश जगताप या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करीत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *