Election News: वाठारला ओबीसी जागेवर कुणबी उमेदवार नको, आ. महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी

Election News ओबीसीच्या राजकीय हक्कासाठी कुणबी उमेदवाराला जोरदार विरोध करणार
Election News वाठार स्टेशन, दि,१४ :– (प्रतिनिधी) माननीय न्यायालयाने मराठा समाजाला कुणबी आरक्षणातून शैक्षणिक व नोकरी संदर्भात आरक्षण दिलेले आहे आरक्षणाचा वापर काही लोक निवडणुकीसाठी करत आहेत तरी अशा लोकांनी कुणबी आरक्षणाचा लाभ घेऊन ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवू नये असा इशारा आमदार महेश शिंदे गटाच्या मराठा कार्यकर्त्यांनी दिला.
अंबवडे संमत वाघोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा कार्यकर्ते बोलत होते यावेळी डॉ . माजी जिल्हा परिषद सदस्य अभय तावरे, तानाजी भाऊ गोळे,वैभव सकुंडे, चंद्रकांत पवार (काका) मनोज आप्पा गाढवे, अशिष सकुंडे,अँड संजय सकुंडे, निखिल भोसले, बाळासाहेब गायकवाड, ललित खरात,तानाजी जाधव,विनेश साळुंखे, शिवाजी साळुंखे, रवींद्र साळुंखे, संदीप फाळके, संदीप बाबर, वसंत नलगे, जितेंद्र कदम, प्रवीण कदम, युवराज नाना कदम, नारायण सकुंडे, जयराम माने, नितीन चव्हाण, सचिन जाधव, मंगेश शितोळे, ज्ञानेश्वर लोंढे,राजेश काळोखे,धनाजी मोहिते, किरण चव्हाण, श्रीकांत चव्हाण, विकास घोरपडे, सुरेंद्र लोंढे,शुभम घोरपडे,विकास मतकर आदी उपस्थितीत होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा तालुका उपाध्यक्ष वैभव सकुंडे म्हणाले आम्हा मराठा समाजाला शैक्षणिक तसेच नोकरीत आरक्षण मिळाले ही चांगली बाब आहे. मात्र गावगाडा चालवत असताना मराठा समाज हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे मराठा समाजाने आज पर्यंत सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन चालत असताना काही बाहेरून कुणबी दाखले घेऊन येणारे लोक वाठार स्टेशन गटात तेढ निर्माण करत आहेत. प्रत्येक समाजाला आपल्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी कुणबी आरक्षणाचे दाखले काढून कोणीही निवडणूक लढवू नये.
यावेळी जितेंद्र कदम म्हणाले वाठार स्टेशन गटात महिला ओबीसी हे आरक्षण पडले असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदालाही महिला ओबीसी हे आरक्षण असल्याने वाठार स्टेशन गटात बाहेरच्या गटातून कुणबी दाखल्याचा आधार घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत तरी अशा लोकांना वाठार जिल्हा परिषद गटात ४० टक्के ओबीसी समाजाचे मतदार साथ देणार नाहीत.
यावेळी तानाजी जाधव म्हणाले आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्व मानणारे आम्ही कार्यकर्ते असून आमदार महेश शिंदे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाणारे नेतृत्व आहे. प्रत्येक समाजाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पाठीशी राहण्याचे काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोण घेत असेल तर त्याला मराठा समाज मान्य करणार नसून त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाईल.
यावेळी ज्ञानेश्वर लोंढे म्हणाले काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी मी वाठार स्टेशन येथे उपोषणास बसलो होतो. त्यावेळी मला सर्व समाजाने पाठिंबा दिला होता. सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीत बाहेरच्या गटातून येऊन उमेदवारी घेऊन ओबीसी आरक्षणात निवडणूक लढवत असेल तर ओबीसी समाजासाठी मी पुन्हा उपोषणास बसण्यास तयार आहे. यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख चंद्रकांत पवार, मंगेश शितोळे, ॲड. संजय सकुंडे,राजेश काळोखे, विकास घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अभय तावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हे पण वाचा Maharashtra Assembly Winter Session 2025 हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी फडणवीस- पटोले खडाजंगी
हे पण वाचा Pune Leopard Attack: अंधारात बोलायला गेला अन बिबट्याने हल्ला केला





