Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटीलांचे आरक्षणासाठी उपोषण
Manoj Jarange Patil Protest महामोर्चा साठी मराठ्यांचा लाखोंचा जनसैलाब,
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानावर मराठ्यांचे भगवं वादळ धडकलं आणि आरक्षणाचा एल्गार केला आहे. एका दिवसाच्या आंदोलनाला परवानगी मिळाली असून महामोर्चासाठी आलेल्या मराठ्यांच्या जनसैलाबाने मुंबई जागेवर थबकली. तर आंदोलनस्थळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु करीत आता सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही,आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा पवित्रा घेत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी ते मुंबई असा महामोर्चा लाखोंच्या गर्दीने मुंबईत आज दाखल झाला. किल्ले शिवनेरी येथे शिवभूमीची माती कपाळी लावून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे भगवं वादळ मुंबईकडे सरकलं होते. आज हा जनसागर मुंबईत दाखल झाला. यामुळे राज्याची राजधानी भगवामय झाली. आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारच्या हातात असताना न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला अशा शब्दात मनोज जरांगे यांनी गुरुवारी राज्य सरकारला फटकारले होते. शिवनेरीची माती कपाळी लावली आहे त्यामुळे आरक्षणासाठी मारायलाही मागे हटणार नाही, एका दिवसाची परवानगी देता मग एक दिवसात मागण्या मान्य का करीत नाही. वारंवार माझ्या समाजाचा, माझा अपमान करता, कारण मी मॅनेज होत नाही. हे त्याचे दुःख आहे, छत्रपतींच्या विचारांवर चालणारे सरकार आमच्यावर गोळ्या घालणार का असा सवालही त्यांनी केला होता.
त्यानंतर आज Manoj Jarange Patil अंतरवाली सराटीपासून मुंबईत दाखल होईपर्यंत ठिकठिकाणी मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत झालं.आज सकाळी 10 च्या सुमारास मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसलेले असले तरी राज्यभरातील मराठा समाज मुंबईत दाखल झाला.
आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटीलांचे उपोषण
Manoj Jarange Patil यांना याआधी आझाद मैदानावरील आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली होती त्यानंतर पोलिसांना अटी शर्ती पाळणारे हमीपत्र देण्यात आल्यानंतर त्यांना एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा लाखो मराठा समर्थकांसह मुंबईत येऊन धडकला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील आझाद मैदानावरती पोहोचले उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मराठा आंदोलकांना मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले आधी सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं आपलं परवानगी दिली आहे आमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झाली आहे असे त्यांनी सांगत कुणीही गडबड गोंधळ करू नका मराठा समाजाला न्याय देण्यासाठी येथे आलो आहे एकजुटीचा फायदा घेऊन आपला समाज मोठा होईल याचा विचार करा आता सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही सरकारने आता गोळ्या घातल्या तरी बलिदान द्यायला तयार आहे पण कदापी मागे हटणार नाही मराठा समाजासाठी मरण पत्करायला तयार आहे मागे हटणारच नाही असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला.
मराठ्यांची मने जिंकण्याची मुख्यमंत्र्याना संधी- मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil आव्हान मराठ्यांची मने जिंकण्याची तुम्हाला संधी यावेळी मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा मराठ्यांचं मन जिंकण्याची संधी तुम्हाला आहे समाजाच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आहे आता तुम्ही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही याच ठिकाणी उपोषण करून मृत्यूपर्यंत असा आवाहन जरांगे यांनी सरकारला केली आहे
