Lionel Messi in India 2025
Lionel Messi in India 2025 | GOAT Tour of India पंतप्रधान मोदींनाही भेटणार
फुटबॉलचा सम्राट आणि जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखला जाणारा लिओनेल मेस्सी (Lionel Messi) डिसेंबर 2025 मध्ये भारताच्या ऐतिहासिक दौऱ्यावर येणार आहे. चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असून, या दौऱ्याला GOAT Tour of India 2025 असे नाव देण्यात आले आहे.
लियोनेल मेस्सींचा 2025 मधील “GOAT Tour of India” हा दौरा निश्चित झाला आहे. 12 डिसेंबर रोजी कोलकात्यातून प्रारंभ होऊन 15 डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींशी भेट घेऊन समारोप होणार आहे. दौऱ्यात भेट, सांस्कृतिक उत्सव, फुटबॉल कार्यक्रम, सेलिब्रिटी इव्हेंट्स आणि मुलांसाठी मास्टरक्लासेस अशी विविध मोहिम समाविष्ट आहेत.
Lionel Messi in India 2025 विश्व विजेत्या अर्जंटीना संघाचा केरळ दौरा रद्द झाल्यानंतर निराश झालेल्या भारतीय फुटबॉलप्रेमींना आता दिलासा मिळाला आहे स्पर्धात्मक सामना खेळण्यासाठी जगभरातील दिग्गज खेळाडू लिऑन मेसी सध्या येणार नसला तरी तो वर्षाखेरीस भारताच्या दौऱ्यावर येणार असून मुंबई कोलकत्ता सह अन्य चार शहरांना भेटीत येणार आहे लियोनेल मेस्सींच्या या दौऱ्यावर शिक्कामोर्तब झाल्याने आयोजकांनी माहिती दिली आहे.
फुटबॉल शौकिनांचे शहर अशी सर्व दूर प्रसिद्धी असलेल्या कोलकाता शहरातून 12 डिसेंबरला Lionel Messi in India 2025 लियॉन मेस्सीच्या भारत दौऱ्याची सुरुवात होईल. याच ठिकाणी कोलकात्यामध्ये त्याच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे यावेळी देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम असा फुटबॉलपटू आहे त्यामुळे लियोनेल मेस्सीं या दौऱ्याला गोट टूर ऑफ इंडिया 2025 असे नाव देण्यात आले आहे.
कोलकाता नंतर लियोनेल मेस्सीं अहमदाबाद मुंबई आणि नवी दिल्ली Messi Mumbai, Kolkata, Ahmedabad, Delhi Visit या शहरांनाही भेटी देईल या ठिकाणीही त्याच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे दरम्यान मेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असून या भेटीने त्याच्या भारत दौऱ्याची सांगता होणार आहे असे दौऱ्याचे आयोजन करते सतद्रू दत्ता यांनी सांगितले आहे.
१ ४ वर्षांनी लियोनेल मेस्सीं चा भारत दौरा GOAT Tour of India
लियोनेल मेस्सीं चा हा दुसरा भारत दौरा असून यापूर्वी तो यापूर्वी तो 2011 साली भारतामध्ये आला होता त्यावेळी तो अर्जेंटिना संघातून वेन्हेझुएला विरुद्ध एक सामना खेळला होता कोलकत्या मधील साल्ट लेक स्टेडियमवर हा सामना रंगला होता दरम्यान मेस्सीच्या दौऱ्याचे हक्क माझ्याकडे आहेत मेसी 28 ऑगस्ट हे एक सप्टेंबर दरम्यान समाज माध्यमांवरून दौऱ्याची अधिकृत घोषणा करणार आहे असेही दत्ता यांनी यावेळी सांगितले दत्ता यांनी या वर्षाच्या सुरुवातीस लियॉन मेस्सीच्या वडिलांची भेट घेतली होती त्यानंतर लियोनेल मेस्सीं आणि दत्त यांची लियोनेल मेस्सीं घरी पाऊण तास चर्चा झाली होती विशेष म्हणजे मेस्सी प्रत्येक शहरात लहान नवोदित फुटबॉलपटूंना मार्गदर्शन करणार आहे लियॉन मेस्सीसह त्याचे इंटरमीयाबीन संघातील सहकारी त्याच्यासोबत येण्याची शक्यता आहे दरम्यान लियोनेल मेस्सीं दौऱ्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांना मेथीच्या भारत दौऱ्याची उत्सुकता लागली आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक (Lionel Messi India Tour Schedule 2025)
- 12 डिसेंबर – कोलकाता (दौऱ्याची सुरुवात, मेस्सी पुतळा अनावरण, GOAT Concert व GOAT Cup फुटबॉल सामना)
- 13 डिसेंबर – अहमदाबाद (अडाणी फाउंडेशन कार्यक्रम)
- 14 डिसेंबर – मुंबई (CCI ब्रेबोर्न व वानखेडे स्टेडियम येथे GOAT Concert, सचिन तेंडुलकर, एम.एस. धोनी, रोहित शर्मा यांच्यासोबत विशेष कार्यक्रम)
- 15 डिसेंबर – नवी दिल्ली (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, Feroz Shah Kotla येथे GOAT Concert आणि Cup, विराट कोहली, शुभमन गिल यांच्याही उपस्थितीची शक्यता)
भारत दौऱ्याची वैशिष्ट्ये
दौऱ्यात मेस्सीसोबत त्याचे माजी सहकारी लुईस सुआरेझ, बुस्केट्स, अल्बा यांच्याही येण्याची शक्यता.
मेस्सीचा दुसरा भारत दौरा, याआधी 2011 मध्ये तो कोलकात्यात अर्जेंटिना vs वेनेझुएला सामना खेळला होता.
या वेळी फक्त मैत्रीपूर्ण सामने नाही, तर कॉनसर्ट, फुटबॉल कप, सेलिब्रिटी मॅचेस आणि युथ फुटबॉलपटूंना मार्गदर्शन असे बहुविध कार्यक्रम होणार आहेत.
