Satara News: सातारा जिल्ह्यातील या ३५ गावांना मिळणार नवीन ग्रामपंचायत इमारत

Satara News: सातारा जिल्ह्यातील या ३५ गावांना मिळणार नवीन ग्रामपंचायत इमारत

Satara News इमारतींच्या बांधकामासाठी 7 कोटी 55 लाखांच्या निधीला मंजुरी

Satara News ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

Satara News सातारा जिल्ह्याच्या ग्रामविकासाच्या दृष्टीने आनंदाची बातमी समोर आली असून जिल्ह्यातील तब्बल ३ ५ ग्रामपंचायतींना नवीन इमारती मिळणार आहेत. यासाठी ग्रामविकास मंत्रालयातून इमारतींच्या बांधकामासाठी 7 कोटी 55 लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली असून याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती दिली.

Satara News याबाबत मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना स्वतःची वेगळी ग्रामपंचायत इमारत नव्हती त्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व मान्यवर पदाधिकारी,यांच्यामार्फत माझ्याकडे कागदपत्रांची पूर्तता व पाठपुरावा केला होता. काल दिनांक 11 जुलै 2025 रोजी सातारा जिल्ह्यातील तब्बल 35 स्वतंत्र ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

“मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी” योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील एकूण 35 ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे या गावांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे.

vikhale

Satara News या ३५ गावांना मिळणार नवीन ग्रामपंचायत इमारत

यामध्ये माण तालुक्यातील वावरहिरे ,हस्तनपुर, शिंदि_खुर्द, खडकी,चिलारवाडी,बोडके,शेणवडी, खटाव तालुक्यातील कणसेवाडी,मोराळे ,राजापूर ,विसापूर,जावली तालुक्यातील आनेवाडी,ओखवडी, एकीव, कराड तालुक्यातील धावरवाडी, भुयाचीवाडी,खराडे,चचेगाव,गोळेश्वर,कालवडे,कापिल,कुसुर, सातारा तालुक्यातील झरेवाडी, भाटमरळी, फत्त्यापूर, अंगापूर (तारगाव), कोरेगाव तालुक्यातील बोरगाव, भावेनगर ,विखळे ,पिंपोडे खुर्द , ल्हासुर्ने फलटण तालुक्यातील काळज , विंचुर्णी, आंदरुड इत्यादी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे.

यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वतंत्र असे पर्यावरणपूरक आणि स्मार्ट ग्रामपंचायत कार्यालय उभारले जाणार आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू