Financial News :पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी संभाजी पतसंस्थेची उद्या वार्षिक सभा

Financial News :पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी संभाजी पतसंस्थेची उद्या वार्षिक सभा

Financial News :५६ शाखा आणि आठ विभागीय कार्यालय असा कार्यविस्तार

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी,
Financial News पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या आणि आठ विभागीय कार्यालयांचे माध्यमातून ५६ शाखाविस्तार केलेल्या satara जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन आज करण्यात आले आहे.

Financial News सर्व शाखा संगणकीकृत व मोबाईल बॅंकिंग सुविधा देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२५ अखेर १३५९ कोटी १३ लाख संमिश्र व्यवसायाची गरूडभरारी घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन बँकिंग सेवा सुलभ आणि सभासदांना अधिक सोई देण्यासोबत कटीबद्ध असलेल्या संभाजी महाराज पतसंस्थेने आपल्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावत ठेवला आहे.

पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दि.२९ जून रोजी सकाळी ठिक ११ वाजता पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव,जि.सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज सांस्कृतिक भवन ( भावेनगर रोड ) येथे बोलविण्यात आली आहे.

या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, चेअरमन डॉ.सोपानराव चव्हाण,व्हाईस चेअरमन श्रीकांत शेटे, संचालक मंडळ,कार्यकारी संचालक भावेश ढमाळ यांनी केले आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)