Sharad Pawar हे २०२४ पूर्वीच हिशोब चुकता करतील.
Ajit Pawar यांनी अपराध केले आहेत त्यातून अभय मिळवण्यासाठी भाजपच्या आश्रयाला गेले आहेत, मात्र त्यांनी हि मोठी चूक केली आहे, भाजपात त्यांना अभय मिळणार नाही उलट Sharad Pawar हे मुत्सद्दी,धूर्त राजकारणी असून ते कुणाला माफ करीत नाहीत, २०२४ पूर्वीच ते हिशोब चुकता करतील असे विधान दिवंगत माजी मुख्यमंत्री Vasantdada Patil यांच्या पत्नी, आणि माजी महसूल मंत्री, कोरेगावच्या माजी आमदार व जेष्ठ राजकारणी शालिनीताई पाटील यांनी केलं. खाजगी वृत्तवाहिन्याना दिलेल्या मुलाखतीत तयांनी सध्याच्या MAHARASHTRA POLITICS CRISISS राजकीय उलथापालथींवर परखड मते व्यक्त केली.
दोन्ही बंडाच्या शालिंनीताई पाटील साक्षीदार
महाराष्ट्रात पहिले बंड झाले त्याला काही मोठा विचार होता आणि हे बंड आहे ते सत्ता पाहिजे, संरक्षण पाहिजे, केलेल्या अपराधाला झाकण्यासाठी संरक्षण पाहिजे यासाठी सत्तेत जायचं, पण असलं फार वेळ टिकणार नाही Sharad Pawar हे मुत्सद्दी,धूर्त राजकारणी असून ते कुणाला माफ करीत नाहीत, २०२४ पूर्वीच ते हिशोब चुकता करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले
शरद पवार यांच्या वागण्याला तात्विक बेस आहे, अजित पवार यांचे वागणं उथळ आहे, ठोस फिलॉसॉफी नाही. शरद पवार यांनी काल सांगितलेले खरे आहे, काँग्रेस मधून बाहेर पडताना त्यांचे नाव, त्यांचे चिन्ह घेतले नाही. नवीन पक्ष निर्माण करून सिद्ध केला. तुम्हाला वाटतं तर तुम्हीही नवीन तयार करा असेही पुढे त्या म्हणाल्या.
माझं वय जरी 90 असेल तरी देखील अजित पवारांच्या विरोधात येत्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार
ईडीच्या भीतीपोटी अजित पवार यांनी हे बंड केलेला आहे. ते भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत. सिंचन घोटाळ्याचे अजित पवार यांच्यावर इतके गंभीर आरोप आहेत. या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. भविष्यामध्ये ते सगळे पुरावे मी समोर आणणार आहे, आजही माझ्या विचारांचे २५ हजार मतदार कोरेगाव खटाव भागात आहेत, माझं वय जरी 90 असेल तरी देखील मी अजित पवारांच्या विरोधात येत्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उतरणार आहे, असा इशाराच शालिनीताईंनी दिला आहे.
ही बातमी देखील वाचा https://maharashtraone.com/?p=139: MAHARASHTRA POLITICS NEWS: भाजपसोबत जाऊन Ajit Pawar यांनी मोठी चूक केली- शालिनीताई पाटील