कोरेगाव उत्तर भागासाठी पूर्णवेळ वनगळ उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित करणार: नामदार महेश शिंदे
उत्तर दुष्काळी भागतील अरबवाडी पाझर तलावात वसना टप्पा एक मधून सोडलं पाणी
कोरेगाव
वसना उपसा सिंचन योजनेतील टप्पा क्रमांक 1 मधून 1 कोटी रुपयांची o.15 टी एम सी अरबवाडी योजना पूर्णत्वास आल्यानंतर या योजनेतून आज अरबवाडी तलावात पाणी सोडण्यात आले या मुळे या भागातील अनेक गावांची शेतीची तहान भागवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल अशी भूमिका कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी ते म्हणाले आज या योजनेतून या भागाला पाणी देऊन मी या भागाला दिलेला शब्द पाळला मात्र मी केवळ एवढ्या वर समाधानी नसून हा तलाव कायमस्वरूपी भरण्यासाठी अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा नदीच्या पाण्यावर वनगळ गावात पाणी अडवून हे पाणी 2200 एच पी पंपाच्या साह्याने उचलून अरबवाडी तलावात सोडून या तलावातून हे पाणी राहिलेल्या गावांना देण्याचं काम वनगळ उपसा सिंचन माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
अरबवाडी तालुका कोरेगाव येथील पाझर तलावात वसना उपसा सिंचन योजनेतील टप्पा क्रमांक एक मधून पाणी सोडण्याच्या कामाचा शुभारंभ कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, उपविभागीय अभियंता शिवाजी पवार,
सातारा जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे,ॲड,संजय सकुंडे,तानाजीराव गोळे,संदीप भोसले,भाजपा कोरेगाव तालुका अध्यक्ष नीलेश यादव, शिवसेना तालुकाप्रमुख काटकर ,शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रकांत पवार,बबनराव भिलारे, पोपटराव दिघे, बाबा नलगे, सरपंच ज्योती सुधीर कोरडे, शामराव कदम, चित्रा चाफेकर, नंदराज मोरे, शक्ती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नामदार महेश शिंदे म्हणाले या भागतील जनतेला भूलथापा देऊन गंडा घालण्याचे काम या पुर्वीच्या लोकप्रतिनिधी ने केले केवळ नारळ फोडून जनतेची दिशाभूल करणाऱ्या या नेतृत्वाला येथील जनतेने नारळ देऊन घरी बसवण्याचं काम केलं अशी टीका नामदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता केली
यावेळी नामदार शिंदे म्हणाले कोरेगाव तालुक्यातील प्रत्येक गाव 98 टक्के सिंचनाखाली आणण्याचे काम आणि बेरोजगार युवकांच्या हाताला काम आणि उर्वरित भागातील तलावात पाणी सोडण्याची भूमिका पुढील काळात घेणार असल्याचे नामदार शिंदे सांगितले.
यावेळी सरपंच प्रशांत पवार ,विलास पवार,सुरेश आफळे, वैभव सकुंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रकाश राजे यांनी प्रास्ताविक मनोज गाढवे यांनी केले. याप्रसंगी बाळकृष्ण नलगे, जगन्नाथ गोळे, दत्तात्रय जाधव, अरुण नलगे, सूर्यकांत नलगे, तुकाराम नलगे, गोविंद नलगे, सुभाष नलगे, किरण गोळे, अजित गोळे, अरविंद कोरडे, प्रवीण कदम, नितीन सावंत, तानाजी सकुंडे, भरत आवाडे, श्रीधर कदम, सुभाष कदम यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थितांचे आभार ॲड संजय सकुंडे यांनी व्यक्त केले.