आय टी एस एफ पद्मश्री महेंद्र कपुर शिक्षण महर्षी अवॉर्ड सोहळा
मुंबईत उद्योगमंत्री उदय सावंत यांचे हस्ते वितरण
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य व शिक्षण क्षेत्रात दर्जेदार विद्यार्थी घडवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष नरसिंग दिसले यांना मुंबई येथील एका शानदार सोहळ्यात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पद्मश्री महेंद्र कपुर शिक्षण महर्षी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहत साई दिशा फाउंडेशन आयोजित पद्मश्री महेंद्र कपुर शिक्षण महर्षी अवॉर्ड 2015 सोहळा आयोजित करण्यात आला होता .यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत ,साईदिशा फाउंडेशन चे प्रमुख दत्तात्रय माने,पद्मश्री महेंद्र कपुर यांचे चिरंजीव रोहन कपूर,प्रसिध्द भजन गायक अनुप जलोटा,अभिनेते सुदेश भोसले, अभिनेते बिंदू दारासिंग,अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागात आरोग्य आणि शिक्षण देणाऱ्या संस्था उभारत नरसिंग दिसले या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली याचा गौरव म्हणून त्यांना साई दिशा फाउंडेशन कडून चालू वर्षी पद्मश्री महेंद्र कपुर शिक्षण महर्षी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले
या अवॉर्ड वितरण सोहळ्यास आदर्श एज्युकेशन सोसायटी चे संचालक चैतन्य दिसले, आदर्श एज्युकेशन सोसायटी चे संचालक नारायण भाऊ दिसले,डॉ.पूजा दिसले,तसेच राजमाता नअर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या,केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल चा प्राचार्य , व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ,केशव देशमुख,निलेश कदम ,पत्रकार अजित जगताप, दत्तात्रय पवार, प्रकाश कुंभार, अतुल वाघ उपस्थित होते.
