Vijayadashami 2025
दसरा किंवा विजयादशमी Vijayadashami 2025 हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला हा सण साजरा केला जातो.हा दिवस धर्म, सत्य आणि न्यायाचा अधर्म, असत्य व अन्यायावर विजय दाखवतो.या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली, अशी कथा आहे.दुसऱ्या आख्यायिकेनुसार, देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा पराभव करून देवतांना विजय मिळवून दिला. यामुळे दसऱ्याचे अध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व अधिक आहे. भारताच्या विविध भागात या दसरा वेगवेगळ्या पद्धतीने शाही मिरवणुकीनेही साजरा केला जातो.
हिंदू पंचांगानुसार वर्षातील मुख्य साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे यांस विजय मुहूर्त म्हणूनही ओळखले जाते यामुळे दसऱ्याच्या दिवशी आयुध पूजा (शस्त्रपूजा) केली जाते, आपापल्या व्यवसायातील साधनांची पूजा करणे. उदा. शेतकरी नांगर, व्यापारी ताळेबंद, विद्यार्थी पुस्तके, सैनिक शस्त्रे. तसेच शमी पूजन करुन शमीची पाने “सोनं” मानून एकमेकांना देतात. याला “सोने वाटणे” म्हणतात. सीमोलंघन करीत गावाच्या किंवा घराच्या सीमेवर जाऊन पूजा केली जाते. महाराष्ट्रातील सर्व गावात पालखीने ग्रामदेवतां सीमेवर नेवून सीमोलंघन केले जाते तसेच विद्यारंभ करणेही आजच्या दिवशी महत्वाचे मानले जाते . मुलांना शिक्षणाची सुरुवात या दिवशी करणे शुभ मानले जाते. नवीन खरेदीसाठी हा मुहूर्त सर्वात महत्वाचा असल्याने या दिवशी घर, वाहन, दागिने, सोने, जमीन खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ समजले जाते.
दसऱ्याशी संबंधित कथा व आख्यायिका
दसरा सणाविषयी अनेक पौराणिक व अध्यात्मिक कथा प्रचलित आहेत. प्रभुरामचंद्रांशी दसरा सणाचे जवळचे नाते जोडले जाते त्यांनी रावणाचा वाढ करुन मिळवलेला विजय यामुळे दसऱ्याला विजयादशमी नाव पडले, उत्तर भारतात रामलीला आयोजित केली जाते व आजच्या दिवशी रावण दहन केले जाते. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या दिवसातील दुर्गापूजेला विशेष महत्व आहे. तर राजस्थान आणि मैसूर येथील राजांच्या शाही दसरा मिरवणुका हि लक्षवेधी असतात.
- राम-रावण युद्ध
रामायणानुसार, या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून विजय मिळवला. त्यामुळे याला “विजयादशमी” असे म्हटले जाते. - दुर्गा देवीचा विजय
महिषासुर नामक राक्षस देवतांना छळत होता. देवी दुर्गेने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून दहाव्या दिवशी त्याचा वध केला. - पांडवांची कथा
वनवासाच्या काळात पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवली होती. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी ती पुन्हा काढून कौरवांविरुद्ध युद्ध सुरू केले. - म्हणूनच दसरा हा विजय, शौर्य, धैर्य आणि यशाचा प्रतीक दिवस मानला जातो.
दसऱ्याचे महत्व
विजयाचा दिवस: या दिवशी केलेले काम यशस्वी होते, असे मानले जाते.
समृद्धी व ऐश्वर्य: शमीची पाने सोनं मानून वाटल्याने धनलाभ व समृद्धी मिळते.
शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ: लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात यासाठी हा दिवस अत्यंत शुभ.
शौर्य व धैर्याचा उत्सव: शस्त्रपूजा, आयुधपूजा यामुळे हा दिवस शौर्याला समर्पित आहे.
दसरा 2025 कसा साजरा करावा?
देवपूजन करून कुटुंबासोबत आरती करावी.
शेजाऱ्यांना, मित्रांना शमीची पाने देऊन “सोने वाटणे” परंपरा पाळावी.
मुलांना मिठाई, फळे देऊन आनंदोत्सव करावा.
ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यावा.
दसरा 2025 तारीख व शुभमुहूर्त (Dasara 2025 Shubh Muhurat)
दसरा 2025 हा २ ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाईल. या दिवशीचा Vijay Muhurat (२:०९ ते २:५६ दुपारी) व Aparahna Puja Time (१:२१ ते ३:४४ दुपारी) हा विशेष शुभ मानला गेला आहे. Dasara 2025 Shubh Muhurat, Vijayadashami Puja Vidhi आणि Dasara Puja Time Today जाणून घेऊन जर श्रद्धा व भक्तीने पूजा केली तर जीवनात यश, विजय व समृद्धी नक्कीच लाभते. यामुळे दसऱ्याच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे.
दशमी तिथी सुरू: १ ऑक्टोबर २०२५, रात्री ७:०१ वाजता
दशमी तिथी समाप्त: २ ऑक्टोबर २०२५, रात्री ७:१० वाजता
पूजा व शुभ कार्यांसाठी महत्त्वाचे काळ:
विजय मुहूर्त (Vijay Muhurat): दुपारी २:०९ ते २:५६
अपराह्न पूजा वेळ (Aparahna Puja Time Today): दुपारी १:२१ ते ३:४४
(स्थानिक पंचांगानुसार वेळेत थोडा फरक असू शकतो, त्यामुळे स्थानिक वेळ तपासणे आवश्यक आहे.)
विजयादशमी पूजा पद्धत (Vijayadashami Puja Vidhi)
१. तयारी
सकाळी लवकर स्नान करून नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावीत.
घर, अंगण व पूजा स्थळ स्वच्छ करून रांगोळी, फुले यांनी सजवावे.
२. संकल्प
देवी दुर्गा किंवा भगवान राम यांच्या प्रतिमेची स्थापना करून हातात पाणी व अक्षता घेऊन संकल्प करावा.
संकल्प करताना “आज विजयादशमी निमित्त मी देवी/श्रीराम यांची पूजा करीत आहे” असे म्हणावे.
३. मुख्य पूजन (Dasara Puja Time Today)
देवीला किंवा श्रीरामाला फुले, हार, अक्षता, हळद, कुंकू अर्पण करावे.
धूप, दीप, नैवेद्य ठेवून आरती करावी.
विशेष मंत्र:
“अपराजितायै नमः”
“जयायै नमः”
“विजयायै नमः”
४. विशेष परंपरा
आयुध पूजा (शस्त्रपूजा): आपापल्या व्यवसायातील साधनांची पूजा करणे. उदा. शेतकरी नांगर, व्यापारी ताळेबंद, विद्यार्थी पुस्तके, सैनिक शस्त्रे.
शमी पूजन: शमीची पाने “सोनं” मानून एकमेकांना देतात. याला “सोने वाटणे” म्हणतात.
सीमा अवलंबन: गावाच्या किंवा घराच्या सीमेवर जाऊन पूजा केली जाते.
विद्यारंभ: मुलांना शिक्षणाची सुरुवात या दिवशी करणे शुभ मानले जाते.
नवीन खरेदी: घर, वाहन, दागिने, सोने, जमीन खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ.
Dasara 2025 Shubh Muhurat, Vijayadashami Puja Vidhi, Dasara Puja Time Today







