T20 World Cup 2026 वानखेडेवर सॅमसनचे तुफान, इंग्लंडला नमवले, टीम इंडियाची फायनल मध्ये दिमाखात एंट्री

T20 World Cup 2026 रंगपंचमीला रंगणार किवीज सॊबत फायनल महामुकाबला
मुंबई: T20 World Cup 2026 भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या उत्कंठेला अखेर पूर्णविराम मिळाला असून टी-२० विश्वचषक २०२६ च्या अत्यंत अटीतटीच्या उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी पार पडलेला हा सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात धावसंख्या असलेल्या सामन्यांपैकी एक ठरला. या विजयासोबतच भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली असून आता संपूर्ण देशाच्या नजरा रविवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या महामुकाबल्याकडे लागल्या आहेत.
या सामन्याची सुरुवात झाली ती इंग्लंडच्या नाणेफेक विजयाने. दव पडण्याची शक्यता गृहीत धरून इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय सलामीवीरांनी त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. सलामीवीर संजू सॅमसनने सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला. सॅमसनने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडताना अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८९ धावांची वादळी खेळी केली, ज्यामध्ये ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याला मधल्या फळीत शिवम दुबे आणि इशान किशन यांनी मोलाची साथ दिली, तर अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्याने केवळ १२ चेंडूत २७ धावा कुटून भारताला २० षटकांत ७ बाद २५३ या विक्रमी धावसंख्येपर्यंत पोहोचवले. T20 World Cup 2026 बाद फेरीतील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली.
२५४ धावांच्या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडनेही हार मानली नाही. युवा फलंदाज जॅकब बेथेलने भारतीय फिरकीपटूंची दाणादाण उडवत केवळ ४८ चेंडूत १०५ धावांचे स्फोटक शतक ठोकले. बेथेलच्या या खेळीमुळे एका क्षणी वानखेडेवर शांतता पसरली होती आणि सामना भारताच्या हातून निसटतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, मोक्याच्या क्षणी भारताचा मुख्य अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहने आपल्या अनुभवाचा वापर करत इंग्लंडच्या धावगतीला लगाम घातला. १८ व्या आणि १९ व्या षटकात बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे इंग्लंडला शेवटच्या षटकात २२ धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात अत्यंत शांत डोक्याने गोलंदाजी करत केवळ १४ धावा दिल्या आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयामुळे आता विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नमवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा महाअंतिम सामना रविवारी, ८ मार्च २०२६ रोजी अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठ्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून मायदेशात खेळत असल्याचा फायदा टीम इंडियाला नक्कीच मिळेल. संजू सॅमसनचा फॉर्म आणि बुमराहची अचूक गोलंदाजी पाहता, भारत पुन्हा एकदा ‘विश्वविजेता’ होण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. संपूर्ण भारत देश आता रविवारी T20 World Cup 2026 चषक उंचावणाऱ्या भारतीय संघाची प्रतीक्षा करत आहे.
मुबंईत झालेल्या सेमी फायनाचा सामना पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी व अनेक दिग्गजांनी हजेरी लावत टीम इंडिया उत्साह वाढवला.
India vs England Semi Final 2026, T20 World Cup 2026 Final, India in World Cup Final, Sanju Samson 89 vs England, Jasprit Bumrah bowling vs England, India vs New Zealand Final Ahmedabad, Wankhede Stadium match highlights, Cricket News Marathi, Team India victory, Jacob Bethell century vs India.





