Shivsena News कोरेगावात शिवसेनेची ताकद वाढवणार, गाव तिथे शाखा अभियानाला गती देणार

Shivsena News कोरेगावात शिवसेनेची ताकद वाढवणार, गाव तिथे शाखा अभियानाला गती देणार

Shivsena News प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शब्द

प्रकाश राजे/ महाराष्ट्र वन न्यूज

Shivsena News कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून शिवसेनेच्या स्थापनेपासून या मतदारसंघाने धनुष्यबाणाला कायम साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यात शिवसेनेची संघटना अधिक बळकट करून गाव तिथे शाखा हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, अशी ग्वाही कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना दिली.

शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी दौऱ्यावर आले असताना कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की कोरेगाव तालुक्याशी माझे जुने नाते आहे. दरे गावाच्या पुनर्वसनामुळे त्यांचे भावबंध आणि नातेवाईक कोरेगाव तालुक्यात वास्तव्यास असून दरे गावामुळेही या भागाशी त्यांचा भावनिक संबंध कायम आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही कोरेगाव तालुक्यावर विशेष प्रेम होते. त्यांच्या पश्चातही या तालुक्याने शिवसेनेशी निष्ठा कायम ठेवली आहे असे त्यांनी नमूद केले. कोरेगाव तालुक्यात गावोगावी शिवसैनिकांची मजबूत फळी असून पक्ष विस्तारासाठी मोठी संधी उपलब्ध आहे. राजाभाऊ बर्गे यांचे जनसामान्यांमध्ये चांगले स्थान व व्यापक संपर्क जाळे असल्याने ते निश्चितच तालुक्यात शिवसेनेचा विस्तार करतील आणि प्रत्येक गावात भगवा फडकवतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. शरद कणसे यांनी आगामी काळात शिवसेना नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात शिवसेना Shivsena वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध धोरणांची माहिती दिली. कोरेगाव सह जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर व्यापक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोरेगाव तालुक्यातील विकास कामां बाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. राजाभाऊ बर्गे यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोरेगाव शहराचा सर्वांगीण विकास झाल्याचे सांगितले. मात्र, काही महत्त्वाची कामे अद्याप प्रलंबित असून त्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गासह इतर महत्त्वाच्या रस्त्यांबाबत ही सकारात्मक चर्चा झाली. दरे गावातील ही बैठक कोरेगाव तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झेंडा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. नव्या पिढीला शिवसेनेची जोडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस संदीप केंजळे, गणेश शेळके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरेगाव तालुक्याशी विशेष ऋणानुबंध- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोरेगाव तालुका आणि कोरेगावच्या बर्गे घराण्याशी माझा गेल्या अनेक वर्षांचा ऋणानुबंध आहे, हा ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न येत्या काळात राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून केला जाईल, उर्वरित विकासकामांना गती देण्यासाठी हे ऋणानुबंध निश्चित उपयोगी पडतील, राजाभाऊंच्या माध्यमातून गावागावात,घराघरात शिवसेना पोहचेल असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

lagnaustav.com
lagnaustav.com

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026)