Shashikant Shinde
अरे ला कारे करण्याची परवानगी द्या Shashikant Shinde
Shashikant Shinde राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्षप्रमुख शरद पवार, मावळते अध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे व कार्यकर्त्यांसमोर शशिकांत शिंदे यांनी पहिलेच भाषण दमदार करीत आपल्या पुढील वाटचालीची चुणूक दाखवली, यावेळी वेळप्रसंगी आरे ला कारे करण्याचीही तयारी असून तुम्ही फक्त परवानगी द्या असे म्हणत आपल्या पक्षाची संस्काराची एक चौकट आहे मात्र समोरील बाजूच्या लोकांना ती समजत नाही तेव्हा त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल असेही स्पष्ट केले.
यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde म्हणाले मागणी शरद पवार यांचे केली विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी विश्वासाने दिली. त्यांच्या या विश्वासाला न्याय देत या नव्या जबाबदारीसाठी मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो…
संघर्षाच्या काळात आम्हा सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सर्व कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेचा वस्तुपाठ घालून दिला असे मावळते प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब यांनी गेली ७ वर्षे पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे पेलली. त्यासाठी त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात काम करत असताना आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहिला असेही त्यांनी सांगितले.
जावळी मतदारसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वजण माझे नेते आहात, असे मानूनच मी काम करत राहील. नवी फळी उभी करून महाराष्ट्रात स्वाभिमानाने आणि निष्ठेने इतिहास घडवायचा आहे. पक्षाला पुन्हा एकदा नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी कटीबद्ध आहे. माझी निष्ठा ही शरद पवार यांच्या चरणाशी राहिली. आजवर निष्ठेने आणि स्वाभिमानाने समाजातील प्रत्येक घटका विषयी लढा देत आलो आहे. त्याचे फलित म्हणूनच आज पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. असेही शशिकांत शिंदे Shashikant Shinde म्हणाले.






