Satara News सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गात निकृष्ट कामाचा संताप! ग्रामस्थांचा रास्ता रोको, काम उखडण्याचा इशारा

Satara News सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गात निकृष्ट कामाचा संताप! ग्रामस्थांचा रास्ता रोको, काम उखडण्याचा इशारा

Satara News अधिकारी आणि ठेकेदाराच्यात विसंगती, ग्रामस्थांनी घेतले फैलावर

Satara News सातारा ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामात सुधारणा न झाल्यास सुरू असलेले काम उखडून टाकण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

मागील दोन वर्षांपासून सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हेरंबाद येथे के.सी.पी.एल. या कंपनीकडून सुरू आहे. मात्र काम सुरू झाल्यापासून आजतागायत हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असले, तरी या नाल्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून दुष्काळी भागात रस्त्याच्या कडेला गरज नसताना डीपीआर मध्ये नाले समावेश केले आहे , काम तकलादू असून अनेक वाहने या नाल्यात अडकली असून अपघातग्रस्त झाली आहेत.

याबाबत वेळोवेळी वाठार स्टेशन, तडवळे, देऊर, पिंपोडे, अंबवडे अशा विविध गावच्या ग्रामस्थानी ठेकेदार व NHAI च्या अधिकारी यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली मात्र अधिकारी यांनी कामात सुधारणा न करता काम रेऊन नेण्याचा प्रकार सुरु केला आहे. मुजोर ठेकेदाराच्या विरोधात अखेर ग्रामस्थानी रस्ता रोखून धरला.

या परिस्थितीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज पंचायत समिती सदस्य निलेश जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, ऍड.पांडुरंग भोसले, नरसिंग दिसले, नाना भिलारे, संदीप भोसले, सागर गायकवाड, गजानन मोरे, नितीन लवंगारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी ११ वाजता अंबवडे संमत वाघोली येथे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत तीव्र घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सुभाष घटे, लक्ष्मण पाटील, के.सी.पी.एल.चे अजित शिंगटे यांनी ग्रामस्थांच्या आरोपांवर खुलासा केला. मात्र या तिघांच्यात कोणत्याही मुद्द्यावर एकमत न्हवते तर केवळ टोलवाटोलवी सुरु होती, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले.

अखेर प्रशासनाने ग्रामस्थांच्या प्रमुख लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लावून तातडीने कामात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. Satara News

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy) SATARA- VAJRAI WATERFALL- INDIAS TALLEST WATERFALL