palkhi
Live Tracking पालखी मार्ग, पालखीचे ठिकाण वाहतुकीत बदल, पार्किंग अशी update एका क्लिकवर
Pune Traffic साठी पोलिसांचे अँप प्रसिद्ध
Pune Palkhi Update:
महाराष्ट्र सध्या भक्ती रसात न्हाहून निघाला असून Ashadhi Vari सुरु झाली आहे. १८ रोजी देहूहुन Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala तुकोबारायांच्या पालखीने पंढरीकडे प्रस्थान केले तर काल १९ रोजी आळंदीहून Sant Dyaneshwar Maharaj Palkhi Sohala संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अलोट उत्साहात पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान झाले.
आज दोन्हीही पालखी सोहळे पुण्यात दाखल होत आहेत अशावेळी पुण्यनगरी ही भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यांच्या समवेत सुमारे ७१९ व इतर दिंडी असे ८००च्या वर दिंड्या आजपासून दोन दिवस पुण्यात मुक्कामाला असतील.
साहजिकच लाखो भाविक पुण्यात डेरेदाखल असताना पालखीचे दर्शन सहज सुलभ व्हावे यासाठी Pune Police यांनी देखील जय्यत तयारी केली असून पालखी सोहळ्याच्या चोख बंदोबस्तसोबत यंदा भाविकांसाठी Online App तयार केले आहे. या अँपच्या माध्यमातून भाविकांना Palkhi Live Tracking करता येणार आहे.
Pune Palkhi Update अशी मिळणार माहिती
पुण्यात दोन्ही संतांचे पालखी सोहळे दाखल होत असताना Pune Palkhi Update भाविकांना घरबसल्या मिळणार आहे अशावेळी Pune Live Traffic Update घरबसल्या समजणार आहे. दोन्ही पालखी सोहळे सध्या कुठे आहेत, सोहळ्याचा पुढील मार्ग, विसाव्याचे आणि मुक्कामाचे ठिकाण याची Live Tracking करण्याची सुविधा यामध्ये आहे. तसेच Pune Traffic ची वाहतुकीतील बदल, नो एंट्री, मार्गातील बदल अशी क्षणोक्षणीची अपडेट या App माध्यमातून मिळणार आहे.
Palkhi Update जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Pune Police यांनी Pune Palkhi Tracking हे app तयार केले असून यावर क्लिक केली असता वारकऱ्यांना Pune Palkhi Update मिनिट मिनिटाला घरबसल्या मिळणार असून palkhi दर्शनाचे नियोजन करणे सोप्प होणार आहे.






