Manoj Jarange Patil:
Manoj Jarange Patil: विरोधकांसह सत्ताधारी आमदारही आझाद मैदानात
Manoj Jarange Patil Protest आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ,
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मुंबईत लाखो मराठा बांधवासमवेत दाखल झालेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत एक दिवसाचे उपोषण केले आहे आहे, अशावेळी आझाद मैदानावर यावेळी त्यांना भेटून या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातील अनेक आमदार- खासदार यांनी हजेरी लावली. विरोधकांसह सत्ताधारी आमदारही पाठींबा देण्यासाठी सहभागी झाल्याने सरकारला घरचा आहेर दिल्याचे चित्र दिसत आहे तर काही केंद्रीय मंत्र्यांनीही या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा दिला आहे .
अंतरवली सराटी येथून शिवनेरी मार्गे मराठा नेते मनोज जरांगे पाटील लाखो मराठा कार्यकर्ते व शेकडो गाड्या घेऊन आरक्षण महामोर्चा काढत मुंबईत आज दाखल झाले. त्यांना एका दिवसाच्या उपोषणाची परवानगी सशर्त देण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर त्यांनी आपली मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करीत माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे त्यांना राज्यातून वाढता प्रतिसाद मिळत आहे अशावेळी अंतरवली सराटी पासून जागोजागी भव्य स्वागत झाले.
मुंबईत आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले यानंतर अनेक आमदार व खासदारांनी उपोषण स्थळाकडे धाव घेतली.विशेषतः मराठवाड्यातील अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनात भेट देत पाठींबा दर्शवला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सर्वप्रथम भेट घेतली त्यांनी या प्रश्नी संसदेतही आवाज उठवला होता. परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व कळंबचे आमदार कैलास पाटील यांचीही हजेरी महत्वाची ठरली.
बीड जिल्ह्यातील तीनही आमदार या आंदोलनात सहभागी झाले, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर व विजयसिंह पंडित यांनीही या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत पाठींबा दिला. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही या लढ्याला पाठींबा दिला.
या राजकीय नेत्यांच्या पाठींब्यामुळे मराठा आरक्षणाला सत्ताधारी आमदारांनीही सरकारवर दबाब वाढवला आहे. संध्याकाळी सहाची मुदत संपल्यावर आंदोलनाचे काय असा प्रश्न उपस्थित होत असताना सरकारने आणखी एक दिवस आंदोलनाला मुदतवाढ दिल्याने मनोज जरांगे पाटील यांना दिलासा मिळाला आहे .






