Iran Israel War इराण-इस्रायल युद्ध पेटले! अमेरिका-इस्रायलच्या भीषण हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू;

Iran Israel War मुख्यालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला, इराणमध्ये ४० दिवसांचा शोक जाहीर
तेहरान/तेल अवीव:
Iran Israel War मध्य पूर्वेतील तणावाने आता युद्धाचे भीषण रूप धारण केले आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर केलेल्या ऐतिहासिक हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (८६) यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी (IRNA) या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.
हल्ल्याचा थरार आणि मोठी हानी: मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या ‘आयडीएफ’ (IDF) आणि अमेरिकन वायुसेनेने इराणमधील लष्करी तळ, अण्वस्त्र प्रकल्प आणि सरकारी मुख्यालयांना लक्ष्य केले. तेहरानमधील खामेनी यांच्या निवासस्थानावर झालेल्या थेट हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Iran Israel War इराणची राजधानी असलेल्या तेहरानमधील ‘पास्तर स्ट्रीट’ (Pastar Street) परिसरातील सर्वोच्च नेत्यांचे निवासस्थान आणि ‘बेत-ए-रहबरी’ (Beit-e-Rahbari) या मुख्यालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल, विशेषतः तेहरानमधील हाय-सिक्युरिटी झोनमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यात सर्वोच्च नेत्यांचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले आहे.”
इराणचा ‘विनाशकारी’ प्रतिहल्ला: खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने तीव्र संताप व्यक्त केला असून इस्रायल आणि अमेरिकेला ‘चिरडून’ टाकण्याची शपथ घेतली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) दुबई, दोहा आणि बहरीन येथील अमेरिकन लष्करी तळांवर डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या संघर्षामुळे आखाती देशांमधील विमान सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून जागतिक स्तरावर भीतीचे वातावरण आहे.
भारतावर काय परिणाम होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीने CCS (Security Cabinet Committee) ची बैठक बोलावली आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, भारतात पेट्रोल-डिझेल महाग होऊ शकते. तसेच इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.
हे पण वाचा USA Iran War अमेरिका–इराण युद्धाचा भडका; मध्यपूर्वेत तणाव शिगेला, जागतिक परिणामांची भीती





