Holi 2026 यावर्षी होळी २ मार्चलाच; चंद्रग्रहणामुळे संभ्रम दूर, पंचांगानुसार स्पष्ट निर्णय

Holi 2026 यावर्षी होळी २ मार्चलाच; चंद्रग्रहणामुळे संभ्रम दूर, पंचांगानुसार स्पष्ट निर्णय

Holi 2026 होलिका दहन सोमवार, २ मार्च २०२६ रोजीच करावे,

Holi 2026 फाल्गुन पौर्णिमेला पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. मात्र यंदा फाल्गुन पौर्णिमेच्या कालावधीतच चंद्रग्रहण येत असल्याने होळी २ मार्चला करावी की ३ मार्चला, याबाबत राज्यभरात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात पंचांग व धर्मशास्त्राच्या आधारे स्पष्टता देण्यात आली असून, यावर्षी होलिका दहन सोमवार, २ मार्च २०२६ रोजीच करावे, असा ठाम निष्कर्ष पंचांगकर्त्यांनी मांडला आहे.

पंचांगानुसार सोमवार, २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात होत आहे. धर्मशास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर पौर्णिमा तिथी असते, त्याच दिवशी होलिका दहन करणे शास्त्रसम्मत मानले जाते. २ मार्च रोजी हा योग स्पष्टपणे उपलब्ध होत असल्यामुळे होळी दहन याच दिवशी करणे योग्य ठरते. Holi 2026

मंगळवार, ३ मार्च रोजी होळी का करू नये, यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या दिवशी असलेले ग्रहणग्रस्तोदित चंद्रग्रहण. ३ मार्च रोजी सूर्योदयाच्या वेळीच चंद्र ग्रहणग्रस्त अवस्थेत असणार आहे. तसेच, प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा तिथी समाप्त होत असल्यामुळे त्या दिवशी होलिका दहन करणे शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. ‘धर्मसिंधू’ ग्रंथातील विशेष वचनानुसार अशा परिस्थितीत मागील दिवशी म्हणजेच २ मार्च रोजीच होलिका दहन करावे, असे स्पष्ट निर्देश आहेत. याच आधारावर दाते पंचांगात होलिका दहनाची तारीख २ मार्च २०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.

भद्रा काळाबाबतही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. २ मार्च रोजी सोमवारी सायंकाळी ५ वाजून ५६ मिनिटांपासून रात्री ९ वाजून २१ मिनिटांपर्यंत भद्रा आहे आणि त्यानंतरही संपूर्ण रात्र भद्रेचा प्रभाव राहतो. मात्र धर्मशास्त्रानुसार, प्रदोष काळात पौर्णिमा अस्तित्वात असताना भद्रा असली तरी होलिका दहन करता येते. त्यामुळे भद्रा काळाचा अडसर होळी दहनासाठी लागू होत नाही, असे पंचांगकर्ते स्पष्ट करतात.

होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार, ३ मार्च रोजी धुलिवंदन साजरे करण्यात येईल. मात्र याच दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे नागरिकांनी ग्रहणाचे वेध आणि शास्त्रीय नियम पाळूनच धुलिवंदन साजरे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रहणग्रस्तोदित चंद्रग्रहण असल्याने सूर्योदयापासून ग्रहण मोक्षापर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते.

या संदर्भात पंचांगकर्ते श्री दाते आणि श्री दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी होळीबाबत कोणताही संभ्रम ठेवू नये. होलिका दहन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी करावे आणि मंगळवार, ३ मार्च रोजी ग्रहणाचे नियम पाळून धुलिवंदन साजरे करावे, हाच शास्त्रानुसार योग्य निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

होळी, होळी २०२६, होलिका दहन, फाल्गुन पौर्णिमा, चंद्रग्रहण, ग्रहणग्रस्तोदित, भद्रा काळ, धुलिवंदन, पंचांग, धर्मसिंधू, दाते पंचांग, धार्मिक बातमी, महाराष्ट्र बातमी, Holi 2026, Holika Dahan, Lunar Eclipse, Chandra Grahan, Hindu Festival, Marathi News, Religious News, Holi 2 March 2026, Holika Dahan date 2026, When is Holi in 2026, Phalguna Purnima Holi, Lunar Eclipse and Holi 2026, Chandra Grahan Holi, Eclipse affected Holi, Holi confusion March 2 or 3, Holika Dahan Panchang, Bhadra period Holi, Dhulivandan 3 March 2026, Hindu festival news

हे पण वाचा Holi 2026 :होळीवर चंद्रग्रहणाचा प्रभाव, ग्रहणामुळे होळी पूजा कधी करावी? पंचांगानुसार संपूर्ण माहिती

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)