Good News त्याला रस्त्यात ४० हजार सापडले, केले प्रामाणिकपणे पोलिसात जमा

Good News त्याला रस्त्यात ४० हजार सापडले, केले प्रामाणिकपणे पोलिसात जमा

Good News वाघोलीच्या विशाल भोइटेनी दिला प्रामाणिकपणाचा ‘विशाल’ अनुभव,

अनपटवाडीच्या व्यवसायिकाची रक्कम रस्त्यात पडली, सुखरूपपणे हाती सुपूर्द

रणजित लेंभे/पिंपोडे बुद्रुक

Good News सध्या प्रामाणिकपणा दुर्मिळ झालाय दररोज भ्रष्ठाचार, फसवणूक अशा अनेक बातम्या समोर येत असताना सातारा जिल्ह्यातील वाघोली येथील विशाल भोईटे या तरुणाने प्रामाणिकपणाचा विशाल अनुभव समाजाला दिला आहे. गावातील रस्त्यावर सापडलेले तब्बल ४० हजार रुपये त्याने तात्काळ कोणतंही मोह न बाळगता वाठार पोलिसात जमा केले, त्याच्या या कृतीमुळे अनपटवाडीच्या व्यवसायिकाची हि ४० हजाराची रक्कम रस्त्यात पडली होती ती सुखरूपपणे हाती त्यांच्या सुपूर्द झाली . विशालच्या या प्रामाणिक कृतीचे पोलीसांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक केले.

कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील विशाल शिवाजी भोईटे हा उच्चशिक्षित तरुण आहे. एम.एस्सी पर्यंत शिकलेल्या विशालने फक्त शिक्षणाने नाहीतर संस्कारानेही उच्च विचाराचे असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. आज सकाळी गावातून पुतण्याला नर्सरीत सोडायला गेला होता यावेळी वाघोली गाव ते हायस्कुल मधल्या रस्त्यावर त्याला पैशाचा बंडल सापडला. त्याने तो मोजला असता ४० हजार होते अशावेळी कोणालाही याचा मोह झाला असता मात्र विशालने तात्काळ वाठार पोलीस ठाण्याला संपर्क करीत याबाबतची कल्पना दिली व थोड्या वेळात समक्ष जाऊन ती रक्कम जमा केली.

अनपटवाडीचे व्यवसायिकओंकार नंदकुमार बोबडे हे दुचाकीहून पिंपोडेला निघाले असता वाघोली येथे त्यांच्या खिशातून हि ४० हजाराची रक्कम रस्त्यात पडली होती ती त्यांना पोलिसांनी ओळख तपासून सुखरूपपणे सुपूर्द केली. विशेष म्हणजे विशाल हा माजी सरपंच शिवाजी जगदेवराव भोईटे यांचा चिरंजिव असून वडिलांनी जपलेली सामाजिक जाणीव त्याच्या आजच्या कृतीतून विशालनेही वारसा म्हणून पुढे नेल्याचे स्पष्ट झाले.

वाठार पोलीस ठाण्याचे सपोनि सुशील भोसले यांनी विशालचा या प्रामाणिक सेवेबद्दल विशेष अभिनंदन केले. Good News

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)