Budget 2025
वक्फ, इमिग्रेशनसह १ ६ विधेयके अधिवेशनात मांडणार
सर्व पक्षीय बैठकीत सरकारची माहिती ,
१ फेब्रुवारीला अर्थसंकल्पाच सादरीकरण
राष्ट्रपतींचे आज संयुक्त सभागृहात अभिभाषण
Budget 2025: आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आजपासून होत असून राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करतील. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.दुसऱ्या दिवशी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. ५ फेब्रुवारीला दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे संसदेचे कामकाज होणार नाही. अधिवेशनाचा पहिला टप्पा १ ३ फेब्रुवारीला संपेल तज दुसरा टप्पा १ ० मार्चला सुरु होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपेल.
वक्फ, इमिग्रेशनसह १ ६ विधेयके अधिवेशनात मांडणार
Budget 2025: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सरकारने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली होती या बैठकीत सरकारने अधिवेशनातील संभाव्य नियोजनाची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना दिली. त्यानुसार येत्या अधिवेशनात वक्फ, इमिग्रेशनसह १ ६ विधेयके अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. संसदेच्या या मध्ये सर्व पक्षीय नेत्यांसमवेत येत्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. ३ ६ पक्षांचे ५ २ नेते बैठकीला उपस्थित होते .
राष्ट्रपतींचे आज संयुक्त सभागृहात अभिभाषण
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ १ जानेवारीला होत असताना राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण करतील. राष्ट्रपतींचे आज संयुक्त सभागृहातील अभिभाषणाने संयुक्त अधिवेशनाला सुरुवात होईल. शनिवारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर सोमवारपासून लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होईल.
Budget 2025: विरोधी पक्षनेत्यांना सहकार्याचे आवाहन
केन्द्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेच्या अधिवेशन दरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन केले . सभागृहात चर्चा सुरळीतपणे होण्यासाठी विरोधी पक्षांची साथ आणि सूचना अपेक्षित असल्याचे त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले, बैठकीत उपस्थित नेत्यांनी काही मुद्दे उपस्थित केले असून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे संबंधित मुद्यावर कधी चर्चा करायची हे हे समिती ठरवेल असेही रिजिजू म्हणाले. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार अनेक विधेयके आणण्याची तयारी करीत आहे असेही सांगितले .
Budget 2025: इंडिया आघाडी एकत्रित मुद्दे मांडणार : काँग्रेस
या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी असा निर्णय घेतला आहे कि इंडिया आघाडी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कुंभमेळा, बेरोजगारी , शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करू इच्छिते. कुंभमेळ्यात व्हीआयपी लोकांच्या आगमनामुळे सामान्य लोकांना अडचणी येत आहेत याची दखल घेण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याबाबत आपला पक्ष संसदेत योग्य भूमिका मांडेल , असेही सांगण्यात आले.








