घिगेवाडी शाळेचा उपक्रम, ग्रामस्थांचा food festival ला उस्फुर्त प्रतिसाद
घिगेवाडी (ता. कोरेगाव ) जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी फूड फेस्टिवल (food festival)आणि भाजी मंडई भरवत व्यवहार ज्ञानाचे धडे प्रत्यक्ष गिरवले, आगळावेगळा असा चिमुकल्यांचा आठवडी बाजार शाळेच्या पटांगणात शाळेच्या वतीने भरविण्यात आला. उद्घाटन श्री.रोहित सावंत-अध्यक्ष स्कूल कमिटी यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थित झाले,ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.
शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला “फुड फेस्टिव्हल-भाजी मंडई ” हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हा केवळ अभ्यासात तर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे.त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम आहे.
या चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या पालेभाजी, चायनीज भेळ, ईडली,मंचुरियन,विविध प्रकारच्या डाळी,घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ,खाद्यपदार्थांमध्ये पॅटीस,भेल सेंटर,वडापाव,पाणीपुरी,भजी-चहा,अशा दुकानांचा यात समावेश होता. ग्रामस्थांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची खरेदी व विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,हा उत्साह पाहून ग्रामस्थ,पालक,महिला बचत गटांच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवयास मिळतात. गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे स्वावलंबन व चिकित्सक वृत्ती वाढीस लागते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते.या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.यातून विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानाची व आर्थिक उलाढालीची आपसूक ओळख होण्यास मदत होईल यात मात्र शंका नाही अशा प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत,मुख्याध्यापक संजय काळे, शिक्षिका सारिका ननावरे,सुधीर सावंत अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन,आदिनाथ सावंत यांनी आपली मनोगतं मांडली.
याप्रसंगी गजानन घिगे,उत्तम सावंत,राजेंद्र सावंत,अनिल घिगे,प्रशांत सावंत,तानाजी भोसले,लक्ष्मण सावंत,तेजस्विनी भोसले,अर्चना सावंत,अशोक घिगे,निलेश सावंत,चंद्रभागा साळुंखे,प्रतिक सावंत,भास्कर घिगे,रविंद्र सावंत,छाया घिगे,संतोष सावंत,भिमराव सावंत,गजानन सावंत,अमृत सावंत,प्रशांत घिगे,महेश सावंत,सुनीता घिगे,कल्पना सावंत,मनीषा धुमाळ,स्कूल कमिटी,सर्व पालक-ग्रामस्थ-महिला-तरुण मंडळ-विद्यार्थी उपस्थित होते मुख्याध्यापक संजय काळे यांनी सर्वांचे आभार मानले.