कोरेगाव बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केला सन्मान
ॲड.पांडुरंग भोसले यांच्यावर सातारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व तालुक्यातील शेतकरी यांच्यावतीने बाजार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आपल्या कुशल कामकाजातून ऍड.पांडुरंग भोसले यांनी शेतकरी हितासाठी काम करुन बाजार समितीचा नावलौकिक वाढवावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल परदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले ॲड.पांडुरंग भोसले हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, पांडुरंग भोसले हे निष्ठेने पक्षाबरोबर राहिले आहेत. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. संघटनवाढीसाठी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची त्यांची तळमळ पाहता त्यांना सर्वोतपरी सहकार्य करू
सत्काराला उत्तर देताना ॲड. पांडुरंग भोसले म्हणाले, माझा राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेला सत्कार हा घरचा आहे. या सत्करामुळे आपणास ऊर्जा मिळाली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला दिलेल्या संधीचे आपण नक्कीच सोने करून दाखवू. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कोरेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.