Satara News वाकड्या पुलाचे रेलिंग तातडीने बसवा, अन्यथा काळे फासणार!

Satara News वाकड्या पुलाचे रेलिंग तातडीने बसवा, अन्यथा काळे फासणार!

ऋषीसेन जाधव अन् विशाल जाधव यांचा बांधकाम विभागाला थेट इशारा!

सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्वाणीचा इशारा; वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक मार्गावरील पुलावर मोठ्या अपघाताची भीती!

वाठार स्टेशन/प्रतिनिधी

Satara News वाठार स्टेशन ते पिंपोडे बुद्रुक या मार्गावरील वाकड्या पुलाला साईड रेलिंग नसल्याने वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पुलाला तातडीने साईड रेलिंग बसवावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा थेट इशारा ऋषीभैय्या जाधव आणि विशाल जाधव यांनी दिला आहे.
वाठार स्टेशनचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऋषीभैय्या जाधव आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल जाधव यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्रुक हा परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वाकड्या पुलाला साईड रेलिंग नसल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पुलाचा अंदाज न आल्यास वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट पुलावरून खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, या धोकादायक परिस्थितीची सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मात्र, वारंवार सूचना करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप जाधव बंधूंनी केला आहे. प्रशासनाला नागरिकांच्या जीवितापेक्षा आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
एखादा मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासनाने जागे होण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ऋषीभैय्या जाधव आणि विशाल जाधव यांनी केली आहे. केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून पुलाला मजबूत साईड रेलिंग बसवावे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
आता जाधव बंधूंच्या थेट इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेणार? पुलाला साईड रेलिंग बसविण्यासाठी तातडीने पावले उचलली जाणार की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार? याकडे वाठार स्टेशनसह पिंपोडे बुद्रुक परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू