99th Marathi Sahitya Sammelan Satara
Sahitya Sammelan राजधानी शाहुनगरी साहित्य संमेलनासाठी सज्ज,
साहित्यिकांची मांदियाळी साताऱ्यात दाखल
रणजित लेंभे – छ. शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा
99th Marathi Sahitya Sammelan Satara साताऱ्यात आजपासून ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा लोकजागर सुरु झाला असून या साहित्य संमेलनासाठी शाहुनगरी सातारा सह संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशन यांच्या संयोजनातून १ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान हे संमेलन साताऱ्यात होत असून राजधानी सातारा स्वागतासाठी सज्ज झाली आहे. छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी यासाठी उभारली असून भव्य व्यासपीठासह तीन मंडप साहित्यिक जागरासाठी उभारण्यात आले असून मराठी साहित्यिक परंपरेची गाथा, ग्रंथ प्रदर्शन, कवी-गझल कट्टा, परिसंवाद, मुलाखती यानिमित्ताने देशभरातील साहित्य रसिकांना अनुभवता येणार आहे. तब्बल ३ ३ वर्षांनी सातारला मराठी साहित्य संमेलन होत आहे.
मावळते अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष साताऱ्यात दाखल
99th Marathi Sahitya Sammelan Satara साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर व यंदाच्या साहित्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील हे कालच साताऱ्यात दाखल झाले असून त्यांच्यासह राज्य व देशभरातील साहित्यिक सातारला दाखल होऊ लागले आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी या साहित्यिकांचे सातारा शाहुनगरीत जोरदार स्वागत केले.
अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या साहित्यिकांना अभिवादन
साताऱ्यात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील थोर साहित्यिक आणि महापुरुषांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन करण्याचा एक आगळावेगळा ‘साहित्यिक प्रवास’चा नवा पायंडा पाडला. संमेलनाच्या अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी विश्वास पाटील यांनी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस या दौऱ्यासाठी राखीव ठेवले होते. मंगळवारी (दि. ३०) त्यांनी तळेगाव दाभाडे (पुणे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देऊन संविधानाच्या शिल्पकार यांना अभिवादन केले. यानंतर नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी आणि मर्ढे (ता. सातारा) येथील आधुनिक मराठी कवितेचे जनक बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाला भेट देऊन साहित्यातील क्रांतीच्या वारसाला उजाळा दिला. येथे त्यांनी मर्ढे ग्रामस्थांशी संवादही साधला. बुधवारी (दि. ३१) सकाळी ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथे जाऊन ‘प्रतिसरकार’चे प्रेरणास्थान क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झाले. त्यानंतर रेठरे हरणाक्ष येथे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जन्मभूमीला भेट देऊन त्यांनी लोकसंस्कृतीचा सन्मान केला. साताऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी कराड येथील प्रीतिसंगमावर जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण केला.
शाहुनगरीत दाखल, स्वराज्यविस्तारक थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन
99th Marathi Sahitya Sammelan Satara संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि ‘पानिपत’ या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांचे बुधवारी साताऱ्यात आगमन झाले. त्यांचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वागत केले. शाहुनगरीत दाखल होताच विश्वास पाटील यांनी आज स्वराज्यविस्तारक थोरले शाहू महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले, थोरले शाहू महाराज दिल्लीहून साताऱ्यात आल्यानंतर एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला होता, आजही त्यांच्या आशीर्वादाने साताऱ्यात मराठी साहित्यातील भाषा, संस्कृती याचे मंथन होत नव्या पर्वाचा शुभारंभ होत आहे. या पवित्र कार्यासाठी संगम माहुलीतील या पवित्र स्थळाचे आशीर्वाद महत्वाचे आहेत.
ध्वजारोहण, ग्रंथदिंडीने साहित्य मेळा दिमाखात सुरु
99th Marathi Sahitya Sammelan Satara एतिहासिक शाहू स्टेडियम येथे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज दिमाखात सुरू झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे ध्वजारोहण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
99th Marathi Sahitya Sammelan Satara उद्घाटन सोहळ्याला संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही प्रमुख उपस्थित होते. त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले, तर यावर्षीचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत कविकट्टा, गझलकट्टा आणि प्रकाशन कट्टा या कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. राजवाडा ते संमेलन स्थळ अशी भव्य ग्रंथ दिंडी व शोभायात्रा यामुळे सातारा साहित्याच्या रंगात रंगला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आणि संत तुकारामांच्या स्मृतिवर्षानिमित्त ‘बहुरूपी भारूड’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने लोकसंस्कृतीचा जागर झाला. चार दिवस चालणाऱ्या या भव्य साहित्य संमेलनात विचारसंवाद, काव्यवाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्व एकत्र येत आहे. 99th Marathi Sahitya Sammelan Satara
हे पण वाचा sport news शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत साताऱ्याने इतिहास रचला..!
हे पण वाचा Gold Rate Today 2025 वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर किती? पहा एका क्लिकवर
