Post Insurance News प्रत्येक पत्रकारासाठी दहा लाखांचा पोस्टल विमा — पश्चिम महाराष्ट्रात पहिला आदर्श पायंडा

Post Insurance News प्रत्येक पत्रकारासाठी दहा लाखांचा पोस्टल विमा — पश्चिम महाराष्ट्रात पहिला आदर्श पायंडा

पिंपोडे बुद्रुक, दि. 7 (प्रतिनिधी)
Post Insurance News प्रत्येक पत्रकारासाठी दहा लाखांचा पोस्टल विमा — पश्चिम महाराष्ट्रात पहिला आदर्श पायंडा पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाने स्तुत्य आणि अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. संघातील सर्व सदस्यांना भारतीय पोस्ट विभागामार्फत प्रत्येकी दहा लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आले असून, असा उपक्रम राबविणारा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला पत्रकार संघ म्हणून उत्तर कोरेगाव पत्रकार संघाने एक आदर्श पायंडा पाडला आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील पोस्ट ऑफिस येथे झाला. या प्रसंगी पोस्टाचे सबपोस्टमास्तर एम. एस. जाधव, पोस्टल असिस्टंट एस. जी. शिंदे, काटकर मॅडम, तसेच तानाजी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विमा अर्जांची पूर्तता व प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला.

या उपक्रमाची संकल्पना पत्रकार संघाचे सदस्य संदीप पवार यांनी मांडली त्यांच्या पुढाकारातून ही योजना प्रत्यक्षात आली. जिल्हा पोस्ट प्रबंधक प्रतीक पाटील व अंबवडे पोस्ट मास्टर उद्धव साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमात बोलताना सबपोस्टमास्तर एम. एस. जाधव म्हणाले, “पत्रकार समाजाचा आरसा आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी विमा संरक्षण हा अत्यावश्यक घटक आहे. उत्तर कोरेगाव पत्रकार संघाने घेतलेले हे पाऊल इतर संघटनांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”पत्रकार संघाचे सदस्य रणजीत लेंभे यांनी सांगितले, “पत्रकारांची जबाबदारी मोठी असते, परंतु त्यांच्या सामाजिक सुरक्षेकडे अनेकदा दुर्लक्ष होते. प्रत्येक पत्रकार आणि त्याच्या कुटुंबाचा आर्थिक आधार सुरक्षित व्हावा, या हेतूने संघाने हा निर्णय घेतला आहे. संघाचे अध्यक्ष प्रकाश कुंभार, तसेच शैलेश धुमाळ, रणजित लेंभे जलालखान पठाण, शुभम गुरव, राहुल लेंभे, कमलाकर खराडे, संजय कदम, स्वप्निल शिंदे, संतोष पवार, तेजस लेंभे, रेवणसिद्ध महाजन, संतोष धुमाळ, मुकुंदराज काकडे, अतुल वाघ, अरुण जायकर, आदिनाथ धुमाळ, विजय दोरके आणि अभिजीत लेंभे हे सर्व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाने केवळ बातमी लेखनापुरते मर्यादित न राहता, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा विचार करणारा एक जबाबदार सामाजिक घटक म्हणून नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026)