सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद सोडत उद्या, इच्छुकांच्या नजरा सोडतीकडे

सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद सोडत उद्या, इच्छुकांच्या नजरा सोडतीकडे

जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

सातारा : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता खाली दर्शविल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे नाव, सभेचे ठिकाण व सभेची वेळ व तारीख याप्रमाणे विशेष सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. उद्या आरक्षणाची सोडत होणार असल्याने या सोडतीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्याच्या नजरा लागल्या आहेत.
1) सातारा जिल्हा परिषद- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा स. ११.३० वा दि. १३/१०/२०२५
2) खंडाळा पंचायत समिती-तहसिल कार्यालय, खंडाळा स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५
3) फलटण पंचायत समिती-सजाई गार्डन मंगल कार्यालय, जाधववाडी (फ) स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५
4) माण पंचायत समिती-तहसिल कार्यालय, दहिवडी सभागृह स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५
5) खटाव पंचायत समिती -पंचायत समिती सभागृह, खटाव स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५
6) कोरेगाव पंचायत समिती- तहसिल कार्यालय, कोरेगांव स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५
7) वाई पंचायत समिती- देशभक्त किसनवीर सभागृह, पंचायत समिती, वाई स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५
8) महाबळेश्वर पंचायत समिती -मध संचालनालय, महाबळेश्वर स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५
9) जावली पंचायत समिती- पंचायत समिती सभागृह, मेढा स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५
10) सातारा पंचायत समिती- स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सभागृह, पंचायत समिती, सातारा स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५
11) पाटण पंचायत समिती-लोकनेते बाळासाहेब देसाई, कृषी संकूल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कराड-चिपळून रोड, काळोली स. ११.३० वा. दि.१३/१०/२०२५
12) कराड पंचायत समिती-स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल), कराड स. ११.३० वा दि.१३/१०/२०२५
जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


WhatsApp Image 2025 10 08 at 9.20.23 AM
Prabhukrupa Two Wheeler Garage
Prabhukrupa Two Wheeler Garage
IMG 20251005 WA0013

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू