Baramati Police :बारामती पोलीस ‘ऍक्शन मोड’ मध्ये, कॉलेज परिसरात कारवाईचा दणका

Baramati Police :बारामती पोलीस ‘ऍक्शन मोड’ मध्ये, कॉलेज परिसरात कारवाईचा दणका

Baramati Police: १०७ वाहनांवर कारवाई करत ठोकला ₹ १,०५,५०० चा दंड

Baramati Police बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात वाहनचालकांकडून सातत्याने होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत तीन दिवसांत तब्बल १०७ वाहनांवर कारवाई करत १,०५,५०० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे, या मोहिमेमुळे बारामती पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून कारवाईचा दणका सुरु आहे याचा चांगलाच परिणाम दिसू लागला आहे.

Baramati Police दिनांक १२, १३ आणि १५ जुलै २०२५ या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आली.वाहनांवर ट्रिपल सीट बसणे, अतिवेगाने गाडी चालवणे, काळ्या काचा, चुकीच्या किंवा नंबर नसलेल्या प्लेट्स अशा प्रकारांवर ही कारवाई होती. टीसी कॉलेज परिसर हा बारामतीतील महत्त्वाचा व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेला भाग असल्याने येथे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. याआधीही या परिसरात अशीच मोहीम राबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तीन दिवसांचे विशेष पथक तयार करून ही कारवाई हाती घेण्यात आली.

कारवाई दरम्यान काही वाहनचालकांनी पोलिसांचा थांबण्याचा इशारा दुर्लक्षित करून वाहन घेऊन पळ काढला. त्यामध्ये (एम.एच.४२ बी.ई. १०६२) या नंबरची लाल रंगाची स्विफ्ट कार काळ्या काचा आणि लहान अक्षरात नंबर प्लेटसह आढळून आली. चालकाला थांबवूनही तो न थांबता पळ काढल्याने माळेगाव पोलिसांच्या मदतीने ही कार ताब्यात घेण्यात आली. तसेच (एम.एच.४२ बी.एच.६६८९) या नंबरची बुलेट गेल्या दीड वर्षांपासून चुकीच्या नंबर प्लेटसह आणि मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरसह फिरत असल्याचे निष्पन्न झाले. यावर करण्यात आलेला दंड इंदापूर तालुक्यातील एका टेम्पोवर जमा होत असल्याचे लक्षात आल्याने वाहतूक पोलिसांकडून याचा मागोवा घेतला जात होता. अखेर ही गाडी ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत आणखी एका मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर असलेल्या यमाहा (एम.एच.४२ बी.आर.११२५) गाडीचाही समावेश होता. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही गाडी न थांबवल्यामुळे पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय (एम.एच.४२ बी.एल. ७२९४) ही स्प्लेंडर प्लस दुचाकी नंबर प्लेटशिवाय फिरताना आढळून आली. हे सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेत डिटेन करण्यात आलेली आहेत. यासह इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक सुभाष काळे, पोलीस अंमलदार प्रदिप काळे, सुधाकर जाधव, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, सिमा घुले, रूपाली जमदाडे, माया निगडे, स्वाती काजळे, दत्तात्रय भोसले. आकाश कांबळे, प्रज्योज चव्हाण आणि शीघ्र कृती दलाचे १४ जवान यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह नियमशिस्तीच्या दृष्टीने ही पावले आवश्यक असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत. सुजाण नागरिकांनी कोणीही वाहतुकीचे नियम मोडत असल्यास ९९२३६३०६५२ या माझ्या क्रमांकावर वाहनाचा क्रमांक, फोटो अथवा व्हिडिओ पाठवावा. त्यावर कारवाई केली जाईल.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती वाहतूक शाखा.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू