रेवडी सोसायटीचे चेअरमनपदी पी.एम .नेवासे सर यांची बिनविरोध निवड

शेतकरी सभासदाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध – पी.एम.नेवासे
रेवडी वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. पांडुरंग महादेव नेवासे तथा पी.एम .सर यांची सर्वानुमते नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
नेवासे सरांविषयी विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतचे सरपंच पदही त्यांनी भूषविले होते .त्यामुळे गाव पातळीवरील दोन्ही पदे भूषवण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे .सरपंच असताना तत्कालीन आमदार डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली नेवासे सरांनी रेवडी गावांमध्ये अनेक विकास कामे करून आपली कारकीर्द दैदीप मान केली होती.
आताही कार्यसम्राट नामदार आमदार महेश दादा शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आताही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली ते रेवडी सोसायटीचा पारदर्शक कारभार करून सर्व सामान्य शेतकरी सभासदांचा आर्थिक स्तर उंचावतील अशी सर्वांना आशा नव्हे तर खात्री आहे. सर्व संचालकांच्या सहकार्याने रेवडी विकास सोसायटी प्रगतीपथावर नेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
श्री नेवासे सरांच्या निवडीबद्दल कोरेगावचे आमदार महेश शिंदे, डॉक्टर अरुणा बर्गे, डॉक्टर प्रियाताई शिंदे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच रेवडीचा महेशदादा शिंदे विचार मंच, सरपंच. व त्यांचे सर्व सहकारी सदस्य, सोसायटीचे सर्व संचालक व रेवडी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले.





