Headlines

Bank News: राज्यातील या सोसायटीने केला शंभर टक्के वसुली पर्यंतचा विक्रम, तोट्यातून घेतली फिनिक्स भरारी co-operative bank,

सातारा satara socity,

कॉपरेट संस्थेला मिळाला ‘कार्पोरेट लूक’

सातारा जिल्ह्यातील देऊर विकास सेवा सोसायटीची कामगिरी

देऊर सोसायटीची शंभर टक्के वसुलीची कामगिरी Co-oprative Bank, Bank News

सहकार म्हटलं कि अनियमितता आणि अनागोंदी, आणि राजकीय हस्तक्षेप अशा अनेक बाबिमुळे सहकारी संस्था अडचणीत येतात,अशाच अडचणीत आलेल्या राज्यातील या विकास सेवा सहकारी सोसायटी संस्थेने तोटयातून शंभर टक्के वसुलीचा विक्रम करण्याची किमया करीत राज्याच्या सहकार क्षेत्रातील हे दुर्मिळ व आशादायी उदाहरण पुढे आणले आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील देऊर सहकारी सोसायटीने अशी अनोखी किमया साधत राखेतून फिनिक्स भरारी घेतली आहे. एकेकाळी अफरातफरीमुळे तोट्यात गेलेल्या या संस्थेने यावर्षी बँक पातळीवर शंभर टक्के वसुलीची कामगिरी करीत प्रगतीच्या दिशेने झेप घेतली आहे. तर संस्थेच्या इमारतीचे नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे काम होऊन संस्थेने आमूलाग्र बदलाचे पर्व घडवून आणले आहे.

सातारा जिल्ह्यात सर्वात मोठी अफरातफर झालेल्या कोरेगाव तालुक्यातील देऊर विकास सेवा सोसायटीलाचा डाग पुसण्याचे काम या सोसायटीचे नवोदित चेअरमन धनसिंग कदम व व्हा चेअरमन धनाजी कदम यांनी केला असून या सोसायटीच्या सभासदांना विश्वासात घेऊन त्यांनी अकरा वर्षानंतर या सोसायटीची बँक पातळीवर  शंभर टक्के वसुली केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रातील संस्था योग्य नेतृत्व केले तर पुन्हा उर्जित अवस्था मिळवू शकतात हे अधोरेखित झाले आहे.

कॉपरेट संस्थेचा ‘कार्पोरेट लूक’

 २०१२-१३ या आर्थिक वर्षात देऊर विकास सेवा सोसायटी मध्ये अफरातफर झलेने ही संस्था अडचणीत आली ही अडचणीत असलेल्या संस्था बाहेर काढण्याचा संकल्प २०२२ मध्ये या संस्थेवर निवडून आलेल्या नवीन संचालक मंडळ व विद्यमान चेअरमन धनसिंग कदम यांनी केला होता त्यानुसार या संस्थेचा त्यांनी कायापालट करण्याचे धाडसी काम केले आहे. व राज्याच्या सहकार क्षेत्रात आशादायी काम करून दाखवले. संस्थेच्या इमारतीची डागडुजी करून रंगरंगोटी करण्यात आली, तसेच कार्यालय संगणीकृत व अत्याधुनिक अत्याधुनिक केले आहे हे करीत असताना दर्जा मध्ये कुठेही कमी ठेवली नाही त्यामुळे कॉपरेट संस्थेला ‘कार्पोरेट लूक’ मिळाला आहे.

बंद पडलेला खत विभागही पुन्हा सुरु

सोसायटीच्या संस्थेची ईमारत दुरस्ती बरोबरच खत विभागही अनेक वर्ष बंद होता, संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने पाठपुरावा करीत हा बंद पडलेला खत विभाग आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे या शिवाय या आर्थिक वर्षात सभासदांना लाभांश वाटप करण्याचा निर्धार नवोदित चेअरमन यांनी केला आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला बँकेकडून शेतीसाठी अर्थसाहाय्य व दर्जेदार खते माफक किमतीत मिळणार आहेत. संस्थेच्या या विकसात्मक कामाविषयी शेतकऱ्यांनी कौतुक केले आहे.

नवीन संचालक मंडळाने केला संस्थेचा कायापालट

 देऊर विकास सोसायटी मध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठी अफरातफर झाली होती त्यामुळे संस्था अडचणीत आली या संस्थेच्या सभासदांचा या संस्थेवरील विश्वास उडला होता तो परत मिळवत जुनी थकीत कर्ज वसुली करणेसाठी चेअरमन धनसिंग कदम यांनी स्वतः या सभासदांना भेटून त्यांना कर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केलं यामुळेच ही संस्था ११ वर्षा नंतर शंभर टक्के कर्ज वसुली करू शकल्याने नवोदित चेअरमन धनसिंग कदम,व्हा, चेअरमन धनाजी कदम,सचिव संजय पवार व संचालक मंडळाचे अभिनंदन कोरेगावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील,संचालक सुनील खत्री,संचालक रामभाऊ लेंभे,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम व देऊर ग्रामस्थांनी अभिनंदन यांनी केले आहे.

Co-oprative Bank, Bank News

हि बातमी वाचली का https://maharashtraone.com/?p=134: Bank News: राज्यातील या सोसायटीने केला शंभर टक्के वसुली पर्यंतचा विक्रम, तोट्यातून घेतली फिनिक्स भरारी co-operative bank, हि बातमी वाचली का https://maharashtraone.com/?p=47: Bank News: राज्यातील या सोसायटीने केला शंभर टक्के वसुली पर्यंतचा विक्रम, तोट्यातून घेतली फिनिक्स भरारी co-operative bank,

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *