
Amdar sachin patil phaltan
आमदार सचिन पाटील यांनी मांडली दुष्काळी व्यथा
वसना सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्याची केली मागणी
गेली कित्येक दशके उत्तर कोरेगावातील गावांना शेती आणि पिण्याचा प्रश्न भेडसावत असून यावर सरकारने जादा पाणी देऊन वसना उपसा सिंचन योजनेचि क्षमता वाढवावी व या योजनेतून वगळलेल्या गावांचाही या योजनेत सहभाग करून या भागाचा दुष्काळाचा शिक्का पुसावा अशी मागणी विधानसभेत फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी केली. या मागणीमुळे सरकार दरबारी पाणी समस्या जिव्हाळ्याने मांडून सभागृहाच्या पटलावर आवाज उठवल्याबद्ल आमदार सचिन पाटील यांना उत्तर कोरेगावच्या नागरिकांनी धन्यवाद दिले तर सात तारखेला अधिवेशन संपल्यावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक आयोजित केली असल्याची माहिती आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र वन न्यूजला दूरध्वनीवरुन दिली.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून यामध्ये आपल्या भागाच्या विकासाच्या समस्या उपस्थित करताना कोरेगाव फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी उत्तर कोरेगावातील २६ गावांच्या पाणी समस्या विधानसभेच्या पटलावर मांडली व वसना सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्याची मागणी केली.
यावेळी आमदार सचिन पाटील विधानसभेत बोलताना म्हणाले, माझ्या मतदार संघातील उत्तर कोरेगाव भागातील २६ गावांचा पाणी प्रश्न गंभीर आहे फडतरवाडी, जाधववाडी, विखळे, तळिये, वाठार स्टेशन, तडवळे, पिंपोडे बुद्रुक, भावेनगर, जगतापनगर, नायगाव, सोळशी, सोनके, दहिगाव, आसनगाव, अनपटवाडी, शहापूर, राऊतवाडी, वाघोली, मोरबिंद, सर्कलवाडी, रणदुल्लाबाद, करंजखोप, नांदवळ, चवनेश्वर ही गावे पाण्यापासून वंचित आहेत शेतकरी राजा सुखी तर राज्य सुखी असे आपण म्हणतो मात्र गेली कित्येक वर्षे इथली परिस्थिती गंभीर आहे. पाण्याअभावी चांगली शेती असून अपेक्षित उत्पन्न घेता येत नाही शेतकऱ्याची मुले शेती कसायची सोडून नोकरी धंद्यासाठी बाहेर जातायेत हि बाबा गंभीर तेव्हा सरकारने या भागात राबवलेली वसना सिंचन योजना पुन्हा सुरु करावी ०. ५२ टीएमसी पाणी अतिरिक्त उपलब्ध झाले आहे ते लवकरात लवकर यासाठी सरकारने निधी उपलब्ध हि योजना पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करावी अशी मागणी आमदार सचिन पाटील यांनी केली.
