
Womans day
Womans day सातारारोडच्या नेटसॉफ्ट कॉम्पुटर यांच्यावतीने महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण
Womans day : सातारारोड (ता.कोरेगाव ) येथील नेटसॉफ्ट कॉम्प्युटरच्या वतीने महिलादिनाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘माझी आई स्मार्ट आई’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यशाळेचे यंदाचे तिसरे वर्ष असून यामाध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मोफत संगणक शिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती नेटसॉफ्ट कॉम्पुटर्सच्या प्रशिक्षका प्रिया प्रताप गुजर यांनी दिली.
ग्रामीण भागातील महिला पर्यंत तंत्रज्ञान पोहचले आहे मात्र याचा सदुपयोग करण्यात महिलांना हे तंत्रज्ञान समजून घ्यावे लागणार आहे. महिला मोबाईल हाताळत आहेत मात्र अद्याप संगणक शिक्षणापासून चार हात लांब आहेत त्यामुळे ज्या महिलांना संगणक शिकण्याची आवड आहे अशा महिलांना महिला दिनाच्या माध्यमातून एक आठवडा विशेष संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यामध्ये मोबाईल सह संगणकाची बेसिक माहिती ते अलीकडील AI तंत्रज्ञानापर्यंतची उपडेट माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे, याशिवाय ३ ६ ० व्ही आर बॉक्सचे प्रात्यिक्षिक दाखवले जाणार आहे. यावेळी महिलांना सायबर सुरक्षेचे महत्व यावर प्रबोधन केले जाणार आहे अशी महिती सेंटरचे संचालक प्रताप गुजर यांनी दिली.
नेट सॉफ्ट कॉम्पुटर दरवर्षी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते यंदाचे हे तिसरे वर्ष असून गत कार्यशाळांना महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे यावर्षी देखील हा उपक्रम राबवत असून या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन नेटसॉफ्ट कॉम्पुटर्सच्या प्रशिक्षका प्रिया प्रताप गुजर यांनी केले आहे.
