Bhakti One: आज ७ रोजी वास्तुशांती, नऊ रोजी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा
Bhakti One: ग्रामदैवत भैरवनाथ व खंडोबा मंदिराचे लोकार्पणा
Bhakti One: आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
Bhakti One: माहेरवासिनींचा होणार साडी खण ओटी देऊन सन्मान
Bhakti One: देऊर (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी गावात लोकवर्गणीतून ग्रामदैवत श्री भैरवनाथ व श्री खंडोबा देवाची सुरेख मंदिरे उभारली असून अवघ्या १० महिन्यात ग्रामस्थांच्या एकजुटीतुन ४५ लाख रुपये लोकवर्गणी जमा होऊन मंदिर साकारले आहे. आज पासून या मंदिरातील श्रीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणा उत्सव सुरु होत असून यनिमित्ताने देऊरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकवर्गणीचे शिवधनुष्य देऊरकरांनी सढळ हाताने उचलले
Bhakti One: गावात ग्रामदैवत भैरवनाथ व कुलदैवत खंडोबा देवांची मंदिर व्हावीत यासाठी गेलीं अनेक वर्ष ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र मंदिर साकारण्याचा कामाला मुहूर्त सापडत नव्हता मागील वर्षी गावच्या ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी देवाची यात्रा भरवण्यासाठी नेहमीप्रमाणे गावकरी महाशिवरात्री ला गावातील विठ्ठल मंदिराच्या पारावर जमले यावेळी सर्व विषय झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व युवकांनी गावातील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी होणार मंदिर होणार की नाही असे प्रश्न उपस्थित करून नवीन मंदिर उभारावे अशी मागणी यात्रा कमिटी कडे केली याच वेळी एका वर्षात म्हणजेच येणारी यात्रा आपण नवीन मंदिरात भरवू असा विश्वास यात्रा कमिटी मधील युवक ग्रामस्थांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला आणि या कामाचा शुभारंभ ही जून महिन्यात मोठ्या दणक्यात झाला या वेळी जवळपास 45 लाखच खर्चाचं मंदिर लोकवर्गणी तून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी निधीचा मोठा प्रश्न होता आणि मंदिर गावच्या पैशातूनच व्हावे अशी भूमिका होती यासाठी गावातील काही युवकांनी एकत्रित येऊन ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी जिर्णोद्धार कमिटी साकारली आणि प्रसिध्द शिल्पकार प्रकाश राठोड यांना या मंदिर उभारण्याचे काम देण्यात आले. गावच्या यात्रा कमेठी कडे शिल्लक असलेलं 14 लाख भाग भांडवल सुरवातीच्या कामासाठी उशाला होत त्यानंतर मंदिराला रक्कम कमी पडू नये यासाठी गावातील काहीं युवकांनी मोठी मेहनत घेत गावातून जमेल तशी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेतला त्याला देऊरकरांनी मोठा प्रतिसाद दिला व सढळ हाताने देणगी देत ४५ लाख रुपयाचे लोकवर्गणी जमा झाली यामुळे मंदिर पूर्णत्वाकडे नेले.
१० महिन्यात उभे राहिले देखणे मंदिर
Bhakti One: या मंदिराची उभारणी करताना मंदिराचा गाभारा आतून ग्रॅनाईट आणि बाहेरून दगडी असा विद्युत रोषणाई सह साकारण्यात आला आहे. गाभाऱ्या बाहेर सभा मंडप आणि महाद्वार अस तीन टप्यात आकर्षक अस काम झालं पाया आणि चार फुटापर्यंत फाउंडेशन संपूर्ण दगडी बांधकाम करून बांधण्यात आले आहे दोन शिखर असलेलं हे मंदिर रात्रीच्या अंधारात ही प्रकाशमय करण्यात आल आहे त्यामुळे हे मंदिर या गावात आगळ वेगळ असून गावच्या सर्व ग्रामस्थांनी ही या मंदिराच्या उभारणीसाठी मोठा आर्थिक आधार दिल्यानं हे शक्य झाल्याच समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे.
देऊरमध्ये आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Bhakti One: या दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार मूर्तीस्थापना व कलशारोहन सोहळा 7 मार्च ते 10 मार्च दरम्यान होत आहे
दिनांक 7 रोजी या दोन्ही मंदिराचा वास्तुशांती समारंभ विधिवत होमहवन पूजा अर्चा करून होणार आहे.श्री भैरवनाथ जोगेश्वरी माता मंदिर आणि श्री खंडोबा म्हाळसा बाणाई देवी मुर्त्यांची टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक होणार आहे.
दिनांक 9 मार्च रोजी श्री भैरवनाथ जोगेश्वरी माता मंदिरात मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे तर रात्री ज्ञानाई भजनी मंडळ शिरंबे यांचं संगीत भजन आयोजित करण्यात आल आहे.
तर दिनांक 10मार्च रोजी श्री खंडोबा म्हाळसा बाणाई देवी मूर्तीस्थापना व कलशारोहन सोहळा होणार असून रात्री ज्योती स्वाती जय मल्हार वाघे मंडळ पार्टी पुरंदावडे तालुका माळशिरस यांचं जागरण होणार आहे.
या दोन्ही देवतांचे धार्मिक विधी जेजुरी गडाचे खंडोबा देवाचे मुख्य पुजारी गोविंद काका बेलारेआणी कडेपठार भक्त एकनाथ वैजनाथ वैरागी या महंतांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत.
…….
माहेरवासीनींचा साडी चोळी देऊन सन्मान
गावातील ग्रामदैवत व कुलदैवत यांच्या मूर्ती स्थापना कलशारोहण समारंभा नंतर दिनांक 9 मार्च रोजी देऊर गावातील माहेरवाशीनींचा साडी चोळी देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.या सोहळ्याला देऊरच्या माहेरवासी भगिनींनी मोठ्या उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मंदिरासाठी 51 किलो वजनाची घंटा
आकर्षक रोषणाई अप्रतिम शिल्पकला अश्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारात जवळपास 51 किलो वजनाची पितळी घंटा हे या मंदिराचे खास आकर्षण ठरत आहे..
Bhakti One: जाहिरात

अप्रतिम….या भैरवनाथ मंदिराने देऊरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार हे मात्र नक्की….अतिशय सुंदर असे शब्दांकन ….वाचून दर्शनाचा मोह होतोय…. आतुरता आहे फक्त आपल्या महाराष्ट्र वनच्या माध्यमातून मंदिराच्या जिर्णोद्धार, मूर्तीस्थापना आणि कलशारोहण या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे आणि दृक श्राव्य दृश्यांकनाची…
त्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा….