Pimpri Chinchwad Municipal Election,
Pimpri Chinchwad Municipal Election :महापालिका रणसंग्राम: राष्ट्रवादी एकत्र? भाजपाला आव्हान कि मैत्रीपूर्ण लढत?
Pimpri Chinchwad Municipal Election :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल सुरू झाली असून भाजपाविरोधात ताकद एकवटण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याठिकाणी भाजपा व अजित पवार राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार हे स्पष्ट झाले आहे अशावेळी हि लढत मैत्रीपूर्ण होणार की काका- पुतणे एकत्र येत आव्हान उभे करणार याकडे सर्वांच्या नजरा आहे, यामुळे पिंपरीच्या मैदानात मतविभाजन टाळण्यासाठी आणि भाजपाला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तशी मागणी स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडूनही होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुका काही ठिकाणी स्वबळावर होतील असे स्पष्ट संकेत दिल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाविरोधात ताकद एकत्र करण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाकडून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे आणि मतविभाजन टाळण्याचे संकेत देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवाय, Pimpri Chinchwad Municipal Election Ajit Pawar Sharad Pawar Alliance शरद पवारांच्या गटाचे कोअर कमिटी सदस्य सुनील गव्हाणे यांनी स्पष्ट केले की, “भाजप हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मूळ शत्रू आहे आणि जर दोन्ही गट स्वतंत्रपणे लढले तर मतविभाजनामुळे भाजपाला फायदा होऊ शकतो”. त्यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांनी युती करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक प्रमुख नाना काटे यांनी सांगितले की, काही काळापूर्वी त्यांनी स्थानिक पातळीवर शरद पवार गटाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे संकेत दिले होते आणि आता दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चेला गती मिळत आहे. प्राथमिक चर्चा सकारात्मक असल्याचेही स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान शरद पवार गटाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून स्थानिक स्तरावर दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर शरद पवार गटाच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याचे संकेत दिले होते. येत्या दोन ते तीन दिवसांत या चर्चेला अधिक स्पष्ट रूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या मते, दोन्ही गट वेगवेगळे लढल्यास मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. NCP Unity Talks in Pimpri Chinchwad, त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता रोखण्यासाठी राष्ट्रवादीने एकत्र येणे गरजेचे असल्याची भूमिका मांडली जात आहे. तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यासोबत आघाडी करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान शरद पवार गटातील नेते सुनील तटकरे यांनीही याबाबत सावध भूमिका घेत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचे मान्य केले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य वेळी अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा एकत्रित प्रयोग प्रत्यक्षात येतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Pimpri Chinchwad Municipal Election, Pimpri Chinchwad Municipal Election, PCMC Election News, Ajit Pawar Sharad Pawar, NCP Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Politics, Maharashtra Municipal Election News, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक, अजित पवार शरद पवार एकत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड राजकारण, भाजपाविरोधात राष्ट्रवादी, महापालिका निवडणूक ताजी बातमी, Maharashtra Municipal Election Political Update, Pimpri Chinchwad Municipal Election Ajit Pawar Sharad Pawar Alliance, PCMC Election NCP BJP Politics, Pimpri Chinchwad Municipal Election Latest News Marathi, NCP Unity Talks in Pimpri Chinchwad,
