Headlines

maharashtra political crisis: शरद पवारांनी बालेकिल्ल्यात दाखवली ‘राष्ट्रवादी पॉवर’

Maharashtra Politcs:

कराड- साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन maharashtra political crisis

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दाखवली शरद पवार निष्ठा,

उलथापालथ करताना काही सहकारी बळी पडले, त्यांना योग्य जागा

दाखवणार – शरद पवार

Maharashtra Politcs: राष्ट्रवादीत झालेल्या बंडाळीनंतर राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी बंड थोपवण्यासाठी स्वतः पुढाकार घेत येत कराड सातारा मध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले, कराड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करून शरद पवार पुन्हा नव्याने पक्ष बांधणीच्या पर्वाला सुरुवात केली. यानिमित्ताने एक्शन मोड मध्ये आलेल्या शरद पवार यांनी बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची पॉवर दाखऊन दिली त्याला बालेकिल्ल्यातील निष्ठावंतांनी तेवढीच भरभरून साथ देत आपण साहेबांसोबत असल्याचे राज्याला दाखवले.

काल झालेल्या सत्तानाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत, काल झालेल्या शपथविधीला या आपला पाठिम्बा नसल्याचे स्पष्ट करीत पक्ष फुटला तरीही न्यायालयात न जाता जनतेत जाणार व पुन्हा जोमाने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरा करणार असल्याचे सांगत ताकदीनिशी लढण्याचा निर्धार स्पष्ट केला. त्यानुसार आज सकाळी पुण्याहून शरद पवार महामार्गाने कराडला आले. कराड येथील प्रीतिसंगमावरील राजकीय गुरु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी पुण्यापासून कराड पर्यंत जागोजागी शरद पवार यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करीत पाठिंबा दर्शिवला. पावसाळी वातावरणातही कार्यकर्ते त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी गर्दी करून होते यातच शरद पवार यांनी राष्ट्रवादीची पॉवर दाखवली.

उलथापालथ करताना काही सहकारी बळी पडले, त्यांना योग्य जागा दाखवणार – शरद पवार NCP CRISISS

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले,” महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्याची सेवा होत असताना ते सरकार या ना त्या पद्धतीने उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात झाले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाण साहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जातीय आणि तत्सम विचारधारा आहेत, यातून देशाचा कारभार पुढे देण्याचा प्रयत्न होतोय.

महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका याच प्रवृत्तींनी घेतली. दुर्दैवाने यात आपले सहकारी बळी पडले. जे घडले त्यानंतर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस एक वेळ उपाशी राहील पण राज्याची सामूहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून उलथापालथ करणारा जो वर्ग आहे त्यांना त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याला फार अवकाश नाही. वर्षभराने पुन्हा लोकांसमोर जायची संधी येईल. त्यावेळी राज्यातील लोकशाहीच्या मार्गाला, शांततेवर विश्वास असणाऱ्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला करूया. पुन्हा एकदा प्रगतीशील आणि सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य आपण निर्माण करूया. maharashtra political crisis

आज गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जनमानस तयार करण्यासंबंधीचा निकाल काल आम्ही घेतला. याची सुरुवात करायची असेल तर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीशिवाय दुसरे स्थळ नाही. तुमचे, माझे, सगळ्यांचे गुरु, या पदावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होता ती व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. त्यांच्या स्मृतिस्थळी याठिकाणी आपण प्रचंड संख्येने आलेत. या प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.,” असे सांगितले.maharashtra political crisis

बालेकिल्ला साताऱ्यातील राष्ट्रवादी ‘साहेबांसमवेत’

राजकीय भूकंपानंतर शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आले यावेळी सातारा जिल्ह्यात त्यांचे जोरदार स्वागत झाले, यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार हे सोबत होते, पण सातारा जिल्ह्यात येताच खासदार श्रीनिवास पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, दीपक पवार अशी दिग्गज नेते मंडळी नी शरद पवार यांचे जोरदार स्वागत केले व दौरा यशस्वी करून दाखवला. लोकसभेला सातारच्या पावसातील सभेने लोकांचा कौल पालटला होता आता पुन्हा याच साताऱ्यातून पक्ष नव्याने बांधण्याच्या कार्याला सुरवात करताना बालेकिल्ला साताऱ्यातील राष्ट्रवादी हि साहेबांसमवेत असल्याचे स्पष्ट झाले. नेत्यासमवेत कार्यकर्त्यांनी हि कराड व सातारा येथे गर्दी करून शक्तिप्रदर्शन केले. maharashtra political crisis

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *