Headlines

UPA नव्हे INDIA, जाणून घ्या कोणते पक्ष आहेत सहभागी

INDIA

सध्या देशात लोकसभेची मोर्चेबांधणी जोरात सुरु आहे, बंगळुरू मध्ये पार पडलेल्या विरोधी पक्षाच्या आघाडीने UPA चे नामांतर करीत इंडिया INDIA (indian national democratic inclusive alliance- भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी) असे नवे नाव जाहीर करीत आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत असे सांगत INDIA च्या एकजुटीचा नारा दिला. 

राष्ट्रीय व प्रादेशिक असे 26 पक्ष एकत्र येत सत्ताधारी NDA विरोधात एकजुटीची वज्रमूठ आवळली, या आघाडीचे UPA चे नामांतर INDIA अर्थात Indian national democratic inclusive alliance असे केले. काँगेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे नाव जाहीर केले. इंडिया च्या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे (महाराष्ट्र), लालू प्रसाद यादव, नितीश कुमार (बिहार), ममता बॅनर्जी( प.बंगाल) मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला (जम्मू आणि काश्मीर), आणि अखिलेश यादव (उत्तर प्रदेश).भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) सरचिटणीस डी. राजा आणि सीपीआय (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी, अरविंद केजरीवाल(दिल्ली) भगवंत मान(पंजाब) एम. के.स्टॅलिन हे विविध पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. इंडिया ची पुढील बैठक मुबई येथे होणार असून यामध्ये ११ जणाची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे.  

या बैठकीत पूर्वीची UPA  हि INDIA झाली साहजिकच या इंडिया यामध्ये कोणते पक्ष सहभागी आहेत हे सर्वासाठी औत्सुक्याचे ठरले तर जाणून घ्या एका क्लिक मध्ये 

1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)

2. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC)

3. द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK)

4. आम आदमी पार्टी (आप):

5. जनता दल (संयुक्त):

6. राष्ट्रीय जनता दल (RJD):

7. झारखंड मुक्ती मोर्चा (JMM):

8. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)- शरद पवार गट

9. शिवसेना (UBT)

10. समाजवादी पक्ष (SP)

11. राष्ट्रीय लोक दल (RLD)

12. अपना दल (कामेरवाडी)

13. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC)

14. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP)

15. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)

16. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI)

17. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन

18. क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP)

19. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक

20. मरुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (MDMK)

21. विदुथलाई चिरुथाईगल काची (VCK)

22. कोंगुनाडू मक्कल देसिया काची (KMDK)

23. मनिथनेय मक्कल कच्ची (MMK)

24. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML)

25. केरळ काँग्रेस (एम)

26. केरळ काँग्रेस (जोसेफ)

(हि माहिती तुम्हाला आवडली तर शेअर व सबस्क्राईब नक्की करा)

NDA : एनडीए मध्ये सहभागी आहेत हे 38 पक्ष, जाणून घ्या एका क्लिक मध्ये https://maharashtraone.com/?p=257: UPA नव्हे INDIA, जाणून घ्या कोणते पक्ष आहेत सहभागी

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *