बोगस बियाण्याच्या बाबतीत मी आमदार असताना कृषीमंत्र्यांना पत्र लिहून सर्वप्रथम आवाज उठविला होता त्यावेळी कृषी विभागाने राज्यात कारवाई सुरु केली होती आता तर कृषी खात्याचा मंत्री झालो आहे. माझी प्राथमिकता हि कोणत्याही शेतकऱयांपर्यंत बोगस बियाणांचा पुरवठा होणारच नाही हि असेल आणि तरीही कोणी बोगस बियाणे पोचवायचा प्रयत्न करीत असेल , राज्यात बोगस बियाणांचा धंदा करीत असेल तर त्याचा धंद्याचा बाजार उठवणार असा सज्जड इशारा महाराष्ट्राचे नवनियुक्त कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.Dhananjay Munde
मुंबईत कृषी विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यादांच आढावा बैठक घेतली यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले, पावसाचे प्रमाणात कमी आहे त्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत तर काही ठिकाणी दुबारचे संकट आहे हि परिस्थिती लक्षात आली ती कॅबिनेट पुढे मांडून निश्चित मांडून धोरण ठरवू. असे ते म्हणाले.
मागेल त्याला शेततळे योजनेत लॉटरी नाही तर थेट मंजुरी : Dhananjay Munde
मागच्या अर्थसंकल्पात मागेल त्याला शेततळे, आणि मागेल त्याला ड्रीप अशी योजना होती आढावा घेताना कृषी विभागाची एक लक्षात आली येथे जेवढे अर्ज येतात त्यातून दहा हजारच्या लॉट प्रमाणे लॉटरी काढली जाते. जर योजना मागेल त्याला शेततळे, आणि मागेल त्याला ड्रीप अशी असेल तर लॉटरी कशासाठी,त्यामुळे जेवढे अर्ज ऑनलाईन पोर्टलवर सुमारे ३ लाख अर्ज आहेत ते सर्व आज तात्काळ क्लियर करा याला लॉटरी ची गरज नाही मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे, आणि ड्रीप मिळाली पाहिजे असा महत्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले
एक रुपया पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या :Dhananjay Munde
जुलै अखेर पर्यंत पाऊस समाधान होईल अशी आशा असून होऊ शकतात काही ठिकाणी त्या दुबारही कराव्या लागतील, सर्व ठीक होईल अशी भगवंतांला प्रार्थना आहे तरीही खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी एक रुपये पीक विम्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा यामध्ये विम्याचा हप्ता सरकार भरणार असून शेतकऱ्याने १ रुपयात ऑनलाईन नोंदणी करायची आहे तरीही ही बरेच शेतकरी गाफील राहत आहेत.