योगाविद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन च्या वतीने अतित येथील साहस मतिमंद मुला मुलींची ची निवासी शाळेला मदतीचा हात देण्यात आला, फाउंडेशन कडून यांना गरजेच्या वस्तुंचे वाटप करुन माणुसकीचा संदेश देण्यात आला.
योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने प्राणायुनिव्हर्स , दि सेंटर ऑफ प्राणिक हीलिंग, फलटण यांचे तर्फे अतित ,निसराळे फाटा, सातारा येथील साहस कायम विनाअनुदानित मतिमंद मुला मुलींची ची निवासी शाळा येथे गहू एक पोते , सूर्यफूल तेल १५ लिटर चे २ डबे , १ किलो मटकी , १ किलो हरभरा , २४ किलो साबण पावडर , फिनाईल १० लिटर,हँड वॉश १० लिटर, १२ कपड्याचे, १२ अंगाचे, १२ भांड्याचे साबण , ६०० एम एल चे ५ पॅराशूट खोबरेल बाटल्या, ३ बकेट इत्यादी गोष्टींचे वाटप करण्यात आले. योगविद्या प्राणिक हिलिंग फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या सेवाभावी उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शाळेतील विशेष गरजांची मुले आणि शिक्षक यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी हा मदतीचा हात पुढे करण्यात आला. योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन महाराष्ट्र नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी कार्यरत असून, त्यांच्या आरोग्य आणि विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते.
या कार्यक्रमादरम्यान संस्थेचे प्रतिनिधी आणि शाळेचे शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती. सर्वांनी हा उपक्रम अतिशय आनंदाने व कृतज्ञतेने स्वीकारला.
योगविद्या प्राणिक हीलिंग फाऊंडेशन महाराष्ट्र या संस्थे तर्फे , प्राणायुनिव्हर्स – दि सेंटर ऑफ प्राणिक हीलिंग , फलटण च्या प्राणशक्ती उपचारक सौ. आर्या राकेश हेंद्रे म्हणाल्या , “समाजातील विशेष गरजांमध्ये असलेल्या मुलांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे आपले कर्तव्य आहे. योगविद्या प्राणिक हीलिंग फाऊंडेशन महाराष्ट्र च्या माध्यमातून केवळ शारीरिक नाही तर मानसिक व आध्यात्मिक आरोग्य सुधारणे व प्रत्येक घरात एक तरी प्राणशक्ती उपचारक घडविणे हाही आमचा उद्देश आहे. “
योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन महाराष्ट्र अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश देत आहे.
सदर कार्यक्रमासाठी योगविद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन महाराष्ट्र च्या फलटण येथील सेंटरचे सौ आर्या हेंद्रे ,श्री राकेश हेंद्रे, सिद्धेश हेंद्रे, तसेच साहस कडून श्री संजय कांबळे व त्यांच्या स्टाफ उपस्थित होता.